रोशन माथायस यांच्याकडून डॉ. कालीदास वायंगणकर आदींचे अवमानकारक बनावट चलचित्र फेसबूकवरून प्रसारित

सायबर गुन्हे विभागाकडे तक्रार प्रविष्ट

शंखवाळी (गोवा) येथील नीज गोंयकार संघटनेच्या पदाधिकार्‍यांवर धर्मांध ख्रिस्त्यांनी प्राणघातक आक्रमण केल्याचे प्रकरण

पणजी (गोवा), १० जून (वार्ता.) – शंखवाळी येथील पुरातत्व खात्याच्या भूमीला अनुसरून नीज गोंयकार संघटनेच्या पदाधिकार्‍यांवर धर्मांध ख्रिस्त्यांनी प्राणघातक आक्रमण केल्याच्या प्रकरणी रोशन लूक माथायस यांनी डॉ. कालीदास वायंगणकर आणि त्यांचे कुटुंबीय, तसेच नीज गोंयकार संघटनेचे पदाधिकारी यांचा अवमान करणारे बनावट चलचित्र फेसबूकवर प्रसारित केले आहे. यासंदर्भात डॉ. कालीदास वायंगणकर यांनी रायबंदर येथील सायबर गुन्हे विभागाकडे तक्रार नोंदवली आहे. ‘रोशन माथायस यांच्या विरोधात प्रथमदर्शनी अहवाल नोंदवून त्यांना कह्यात घ्यावे’, अशी मागणी या तक्रारीत करण्यात आली आहे.

डॉ. कालीदास वायंगणकर यांनी तक्रारीत म्हटले आहे की, रोशन माथायस यांनी फेसबूकवर ‘गोवा स्पीक्स’ या गटावर मी, माझी आई आणि मावशी, तसेच माझे मित्र तथा ‘नीज गोंयकार रिव्हॉल्युशनरी फ्रंट’चे पदाधिकारी चंद्रशेखर वस्त आणि सुरेश नाईक यांचा अवमान करणारे चलचित्र ‘पोस्ट’ केले आहे. शंखवाळ येथील घटनेला अनुसरून माझ्या इतरांशी झालेल्या संभाषणाचा महत्त्वाचा भाग वगळून त्या ठिकाणी निरनिराळी गाणी पोस्ट केली आहेत. माझे संभाषण इतरांना समजू नये, हा यामागील हेतू आहे. फेसबूक पोस्टमध्ये आम्हाला गुंड, लांडगे, असे संबोधण्यात आले आहे. त्यामुळे मी, माझे कुटुंबीय आणि मित्र यांची प्रतिमा मलीन झाली आहे. माझ्या व्यवसायावरही यामुळे परिणाम झालेला आहे, तसेच माझी राजकीय कारकीर्दही नष्ट करण्यात आली आहे.

‘सत्यमेव जयते’ लोगोचा गैरवापर करून चलचित्र केंद्र सरकारने प्रसारित केल्याचे भासवण्याचा प्रयत्न

रोशन माथायस यांनी या चलचित्रामध्ये ‘सत्यमेव जयते’ या लोगोचा गैरवापर करून चलचित्र केंद्र सरकारने प्रसारित केल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला आहे. याद्वारे माथायस यांनी धार्मिक द्वेष निर्माण करून दंगल भडकावण्याचा प्रयत्न केला आहे, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. (केंद्र सरकार याची नोंद घेणार कि अल्पसंख्यांकांना घाबरून गप्प बसणार ? – संपादक)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now