जगभरात चिंतेचा विषय ठरलेला ‘कॅन्डिडा ऑरिस’ जिवाणू : ९० दिवसांच्या आत होतो रुग्णाचा मृत्यू !

वैद्यकीयशास्त्र आणि विज्ञान त्यांच्या कक्षा रुंदावत असतांनाच दुसरीकडे नवनवीन आजारही जगभर त्यांचे पाय पसरत आहेत. अलीकडेच ‘कॅन्डिडा ऑरिस’ नावाचा जिवाणू जगभरात चिंतेचा विषय ठरत आहे. या जिवाणूच्या संक्रमणामुळे (फंगसमुळे) अनेकांना जीव गमवावा लागत आहे. भारतात या जिवाणूमुळे अनेक लोक बळी पडत आहेत; कारण यावर कोणताही वैद्यकीय उपचार परिणाम करत नाही. रुग्णाच्या मृत्यूनंतरही हे जिवाणू जिवंत रहातात आणि वाढतात, ही धक्कादायक गोष्ट आहे.

१. ‘नवभारत टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार ग्लोबल थ्रेट करण्यात आलेल्या ‘कॅन्डिडा ऑरिस’चे रुग्ण भारतात वर्ष २०११ पासून समोर येत आहेत. एका माहितीनुसार ‘कॅन्डिडा ऑरिस’चा रुग्ण सर्वप्रथम ब्रुकलिन येथे मिळाला होता. एका व्यक्तीच्या रक्ततपासणीमधून ती या आजाराने पीडित असल्याचे समोर आले होेते. ‘कॅन्डिडा ऑरिस’ एक असा आजार आहे, ज्याचे जिवाणू सामान्यपणे रुग्णालयाच्या वातावरणात वाढतात आणि त्याची रोगप्रतिकारक शक्ती न्यून असलेल्या व्यक्तींना लागण होते.

२. वर्ष २०१२ ते २०१७ या कालावधीत रुग्णालयात भरती करण्यात आलेल्या १० रुग्णांपैकी २ रुग्ण कॅन्डिडा ऑरिसचे होते, असे नुकत्याच ‘एम्स ट्रॉमा सेंटर’च्या डॉक्टरांनी केलेल्या अभ्यासातून समोर आले आहे.

३. आतापर्यंत ‘कॅन्डिडा ऑरिस’शी संबंधित जेवढी प्रकरणे समोर आली आहेत, त्यात ९० दिवसांच्या आत रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

४. ‘द इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ने वर्ष २०१७ मध्ये सर्वच रुग्णालयांसाठी एक सूचना काढली होती. त्यानुसार ‘कॅन्डिडा ऑरिस’ या जिवाणूमुळे मृत्यूमुखी पडणार्‍यांचा आकडा ३३ ते ७२ टक्के आहे.

५. ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार ‘कॅन्डिडा ऑरिस’ जिवाणू २० देशांमध्ये पसरला आहे.


Multi Language |Offline reading | PDF