म्यानमार १० लाख रोहिंग्या शरणार्थींना परत घेण्यास इच्छुक नाही !- बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना

‘भारतात घुसखोरी केलेल्या सुमारे ५ कोटी बांगलादेशींना बांगलादेश कधी परत घेणार ?’, याचे उत्तर शेख हसीना यांनी दिले पाहिजे !

ढाका – म्यानमार हा बांगलादेशामध्ये आश्रयासाठी आलेल्या तेथील १० लाख रोहिंग्या मुसलमांना परत घेण्यास इच्छुक नाही, असा आरोप बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी केला आहे. ‘काही आंतरराष्ट्रीय यंत्रणा बांगलादेशावर ओढवलेले शरणार्थींचे संकट तसेच रहावे, यासाठी प्रयत्न करत आहेत’, असाही आरोप त्यांनी केला. वर्ष २०१८ मध्ये बांगलादेश आणि म्यानमार यांच्यामध्ये या शरणार्थींना परत घेण्याच्या संदर्भात करार झाला होता. यानुसार २ वर्षांत प्रत्येक आठवड्यात दीड सहस्र रोहिंग्यांना म्यानमारमध्ये परत बोलावण्यात येईल, असे ठरले होते. प्रत्यक्षात तसे झालेले नाही.

म्यानमारमध्ये रोहिंग्यांच्या आतंकवादी संघटनेने ३० हून अधिक पोलीस ठाण्यांवर आक्रमण केल्यानंतर सैन्याने धडक कृती केली, तसेच संतप्त बौद्धांनीही आक्रमण केल्यानंतर १० लाख रोहिंग्यांनी तेथून पलायन करून बांगलादेशमध्ये आश्रय घेतला आहे.


Multi Language |Offline reading | PDF