जदयुचे नेते प्रशांत किशोर यांनी ममता बॅनर्जी यांची भेट घेणे, याचा पक्षाशी संबंध नाही ! – नितीश कुमार

बंगालमधील विधानसभेच्या निवडणुकीसाठी जदयुचे नेते आणि राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी ममता बॅनर्जी यांना साहाय्य करणार असल्याचे प्रकरण

पाटलीपुत्र – जदयुचे नेते आणि राजकीय रणनीतीकार प्रशांत भूषण हे वर्ष २०२१ मध्ये बंगालमध्ये होणारी विधानसभेची निवडणूक जिंकण्यासाठी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला साहाय्य करणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर प्रशांत किशोर हे ममता बॅनर्जी यांची भेट घेणार आहेत. ‘या भेटीचा आणि पक्षाचा काहीही संबंध नाही’, असे पक्षाचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सांगितले. प्रशांत किशोर हे राजकीर रणनीती आखणार्‍या एका संस्थेशी संबंधित आहेत. ‘ही संस्था ज्या पक्षांसाठी कार्य करते, त्याच्याशी आमच्या पक्षाचा काहीही संबंध नाही’, असे नितीश कुमार यांनी स्पष्ट केले.


Multi Language |Offline reading | PDF