देहलीच्या संरक्षणासाठी अमेरिकेकडून क्षेपणास्त्रप्रणाली विकत घेणार

नवी देहली – भारताची राजधानी देहलीच्या सुरक्षेसाठी अमेरिकेकडून ‘नॅशनल अ‍ॅडव्हान्स सरफेस टू एअर मिसाईल सिस्टम-४’ खरेदी करण्यात येणार आहे. हे क्षेपणास्त्र खरेदी केल्यास देहलीचे कोणत्याही क्षेपणास्त्राच्या आक्रमणापासून, तसेच ड्रोन आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्र यांच्यापासूनही संरक्षण होणार आहे. व्यवहार पूर्ण झाल्यानंतर २ ते ४ वर्षांच्या कालावधीत ही क्षेपणास्त्रप्रणाली भारताला मिळणार आहे.

 


Multi Language |Offline reading | PDF