सुव्यवस्थापन आणि नीतीनिश्‍चिती हा हिंदु राष्ट्राचा पाया ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘राष्ट्रीय हिंदु राष्ट्र आणि साधना शिबिरा’ला प्रारंभ

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

सनातन आश्रम, रामनाथी (गोवा), १० जून (वार्ता.) – सुव्यवस्थापन आणि नीतीनिश्‍चिती हा हिंदु राष्ट्राचा पाया आहे. प्रत्येक कृती परिपूर्ण करणे, हे सुव्यवस्थापनाचेच एक अंग आहे. दूरदृष्टीने विचार करण्याची सवय असेल, तर योग्य वेळी योग्य निर्णय घेतले जातात. साधकांच्या अडचणी सोडवणे, हे उत्तरदायी साधकांचे दायित्व आहे. ज्ञानशक्तीच्या माध्यमातून विहंगम आध्यात्मिक प्रगती होत असल्याने चिंतन आणि नियोजन अधिकाधिक चांगले करण्याचा प्रयत्न करायला हवा. शिकायला मिळालेली सूत्रे आचरणात आणल्यानेच साधना होणार आहे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘राष्ट्रीय हिंदु राष्ट्र आणि साधना शिबिरा’चा प्रारंभ १० जून या दिवशी झाला. या शिबिराचा उद्देश सांगतांना सद्गुरु (डॉ.) पिंगळे बोलत होते. या प्रसंगी व्यासपिठावर हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे, तसेच हिंदु जनजागृती समितीचे केंद्रीय समन्वयक श्री. नागेश गाडे हे उपस्थित होते. हे शिबीर १६ जूनपर्यंत असणार आहे.

डावीकडून सद्गुरु सत्यवान कदम, पू. (सौ.) संगीता जाधव, दीपप्रज्वलन करतांना सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर आणि पू. नीलेश सिंगबाळ

शंखनाद करून या शिबिराला प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर सद्गुरु सत्यवान कदम, सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर, पू. (सौ.) संगीता जाधव आणि पू. नीलेश सिंगबाळ यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. या शिबिरात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राबवण्यात येणार्‍या विविध उपक्रमांचा विस्तार आणि कार्यात गुणात्मक अन् संख्यात्मक वृद्धी होण्याच्या दृष्टीने चिंतन करण्यात येणार आहे.


Multi Language |Offline reading | PDF