अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांच्या सुटकेसाठी जयपूर येथील डिस्ट्रिक्ट बार असोसिएशनकडून केंद्रीय गृहसचिवांना निवेदन

जयपूर (राजस्थान) – डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणात अन्याय्य अटक करण्यात आलेले हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांची सुटका करावी, यासाठी येथील डिस्ट्रिक्ट बार असोसिएशनने अतिरिक्त जिल्हाधिकार्‍यांना केंद्रीय गृहसचिवांना देण्यासाठीचे निवेदन सादर केले.

अतिरिक्त जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर करतांना अधिवक्ता

१. ‘डिस्ट्रिक्ट बार असोसिएशन’चे अध्यक्ष डॉ. सुनील शर्मा यांनी अधिवक्ता पुनाळेकर यांची सीबीआयने केलेल्या अटकेचा निषेध केला आणि त्यांची त्वरित सुटका करण्यात यावी, अशी मागणी केली. तसेच ‘बार कौन्सिल ऑफ इंडिया’ला विनंती केली आहे की, या घटनेची नोंद घेऊन अधिवक्त्यांच्या अधिकारावर झालेल्या आघाताला रोखण्यात यावे.

२. याच संदर्भात ‘डिस्ट्रिक्ट बार असोसिएशन’कडून ‘बार कौन्सिल ऑफ राजस्थान’च्या सचिवांनाही निवेदन देण्यात आले. या वेळी अधिवक्ता सुभाषकुमार शर्मा, अधिवक्ता बनवारी लाल, अधिवक्ता रामस्वरूप धनेवा, अधिवक्ता संपतलाल, अधिवक्ता रत्नेंसु शर्मा, अधिवक्ता तेजसिंह गुर्जर आदी उपस्थित होते.


Multi Language |Offline reading | PDF