(म्हणे) ‘ईव्हीएम्’मध्ये नव्हे, तर निवडणूक अधिकार्‍यांकडून मतमोजणीच्या वेळी गडबड !’ – शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस

लोकसभा निवडणुकीतील पराभव जिव्हारी लागल्याने शरद पवार प्रतिदिन नवीन वक्तव्य करत आहेत, यात काय आश्‍चर्य !

मुंबई – ‘ईव्हीएम् अथवा व्हीव्हीपॅट’मध्ये अडचण नसून निवडणूक अधिकार्‍यांकडून मतमोजणीच्या वेळी गडबड होत आहे, असा संशय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करतांना व्यक्त केला. १० जूनला राष्ट्रवादी काँग्रेसच्या २० व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. (निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रसचे उमेदवार विजयी झाल्यास ईव्हीएम् यंत्र चांगले आणि त्यांचा पराभव झाल्यास हे यंत्र खराब अथवा निवडणूक अधिकार्‍यांकडून गडबड, अशी विधाने करून शरद पवार यातून काय साध्य करत आहेत ? लोकसभा निवडणुकीत निवडणूक अधिकार्‍यांकडून खरोखरच गडबड झाली असेल, तर शरद पवार यांनी ते पुराव्यांसह सिद्ध केले पाहिजे, अन्यथा नुसत्या अशा बोलण्यावर लोकांचा पवार यांच्यावर विश्‍वास बसेल का ? – संपादक) 

शरद पवार पुढे म्हणाले की…

१. मतमोजणीच्या वेळी होणार्‍या घोटाळ्याच्या खोलात जाणार आहे. मतदार ज्या ठिकाणी मतदान करतात, त्या ‘ईव्हीएम किंवा व्हीव्हीपॅट’मध्ये काहीच घोटाळा नाही; मात्र ज्या वेळी ‘ईव्हीएम्’ निवडणूक अधिकार्‍यांच्या हाती जाते. त्यांच्याकडून मतमोजणी केली जाते, त्या वेळी काहीतरी गडबड होते.

२. आम्ही काही तंत्रज्ञ आणि विरोधक यांच्याशी चर्चा करून या प्रकरणाच्या खोलात जाणार आहोत. मतदान आणि मतमोजणी यांतील घोटाळा लोकांच्या लक्षात आल्यास लोक कायदा हातात घेतील. आपण दिलेले मत आपल्या पसंतीच्या उमेदवाराला जात नसल्याचे लोकांच्या लक्षात आल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होईल. आम्ही ते होऊ देणार नाही.


Multi Language |Offline reading | PDF