अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांच्या अटकेच्या प्रकरणी विधानसभेत आवाज उठवू ! – आमदार राजेश क्षीरसागर

हिंदुत्वाच्या सूत्रावर शिवसेना प्रत्येक वेळी ठामपणे बाजू मांडत असल्याने सामान्य हिंदूंना नेहमीच शिवसेनेचा आधार वाटतो !

आमदार श्री. राजेश क्षीरसागर (उजवीकडे) यांना निवेदन देतांना श्री. मधुकर नाझरे (डावीकडे)

कोल्हापूर, १० जून (वार्ता.) – हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांच्या अटकेच्या प्रकरणी विधानसभेत आवाज उठवू, तसेच यावर विधानसभेत चर्चा घडवून आणू. या प्रकरणाच्या संदर्भात जे काही सर्व करणे शक्य आहे, ते मी करीन, असे आश्‍वासन शिवसेनेचे आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांनी दिले. राष्ट्रप्रेमी आणि प्रखर हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता संजीव पुनाळेकर अन् माहिती अधिकार कार्यकर्ते श्री. विक्रम भावे यांना सीबीआयने डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येच्या प्रकरणी अटक केली आहे. सीबीआयने केलेली ही कारवाई अत्यंत चुकीची आणि निषेधार्ह आहे. तरी अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांची त्वरित मुक्तता करावी, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीचे श्री. मधुकर नाझरे यांनी शिवसेनेचे आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांना दिले. त्या वेळी त्यांनी हे आश्‍वासन दिले.


Multi Language |Offline reading | PDF