प्रखर हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांची त्वरित मुक्तता करा ! – कागल तालुक्यातील समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे निवेदन

अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांच्या अन्याय्य अटकेचे प्रकरण

नूतन खासदार श्री. संजय मंडलिक (१) यांना निवेदन देतांना कागल तालुक्यातील समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते

हमीदवाडा (ता. कागल, जिल्हा कोल्हापूर), १० जून (वार्ता.) – हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर आणि माहिती अधिकार कार्यकर्ते श्री. विक्रम भावे यांना सीबीआयने डॉ. दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक केली आहे. या प्रकरणातील सीबीआयच्या भूमिकेचा तपास करण्यात यावा, तसेच अधिवक्ता संजीव पुनाळेकर आणि श्री. विक्रम भावे यांना त्वरित मुक्त करावे, या मागणीचे निवेदन कागल तालुक्यातील समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे नूतन खासदार श्री. संजय मंडलिक यांना हमीदवाडा येथील सदाशिवराव मंडलिक सहकारी साखर कारखाना येथे दिले.

या वेळी श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे कागल तालुकाध्यक्ष श्री. विजय आरेकर, किसान संघाचे श्री. दिलीप पाटील, भाजपचे तालुका सरचिटणीस श्री. आनंदा मांगले, बजरंग दलाचे श्री. विनायक आवळे, शिवसेना उपशहरप्रमुख श्री. प्रभाकर थोरात, हिंदु जनजागृती समितीचे श्री. बाबासाहेब भोपळे, सनातन संस्थेचे श्री. दीपक भोपळे आणि श्री. सूरज पाटील उपस्थित होते.


Multi Language |Offline reading | PDF