घरकुल घोटाळ्याचे वार्तांकन करण्यास गेलेल्या पत्रकारांना पोलीस उपनिरीक्षकांची अरेरावी !

कारवाई करण्याची पोलीस अधीक्षकांकडे मागणी !

धुळे – येथील सत्र न्यायालयात घरकुल घोटाळ्याचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना आत जाण्यास अटकाव करून अरेरावी करणारे पोलीस उपनिरीक्षक मनोज खडसे यांच्यावर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन पोलीस अधीक्षक विश्‍वासराव पांढरे यांना देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की, घरकुल घोटाळ्याच्या निकालाचे वार्तांकन करण्यासाठी पत्रकार न्यायालयात गेले असता पोलीस उपनिरीक्षक मनोज खडसे यांनी पत्रकार गणेश सूर्यवंशी, विजय शिंदे यांच्याशी वाद घातला. यानंतर पत्रकार प्रशांत परदेशी आले असता त्यांनाही धक्काबुक्की झाली. तसेच या वेळी शाब्दिक चकमक झाली. त्यामुळे संबंधित पोलीस उपनिरीक्षकावर कारवाई करण्यात यावी.


Multi Language |Offline reading | PDF