राज्यघटनेत संशोधन करून ‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’ शब्द वापरावा ! – स्वदेशी जागरण मंच

पुणे – भारतीय राज्यघटनेवर संशोधन होऊन ‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’ हा शब्द वापरला जावा, याविषयी सरकारला प्रस्ताव पाठवला आहे, असे ‘स्वदेशी जागरण मंचा’चे राष्ट्रीय सहसंयोजक डॉ. अशवनी महाजन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. स्वदेशी जागरण मंचाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत ‘इंडिया दॅट इज भारत’ असा उल्लेख वगळून केवळ ‘भारत’ असा उल्लेख असावा, याविषयीचा ठरावही संमत करण्यात आला.

विकासाची व्याख्या एफ्डीआय, जीडीपी यांवरून न ठरवता सर्वसमावेशक विकासाला प्राधान्य दिले गेले पाहिजे. डेअरी उत्पादनांसाठी अमेरिका भारतावर दबाव आणत आहे; मात्र ती डेअरी उत्पादने मांसाहारी गायींपासून बनवलेली असल्याने भारताने हा करार करू नये. आर्सेपच्या अंतर्गत चीनशी करार केल्यास चिनी वस्तूंना विरोध करण्याचा हक्क भारत सरकार गमावून बसेल, असे मंचाने म्हटले आहे.


Multi Language |Offline reading | PDF