पाकिस्तानमध्ये अल्पवयीन हिंदु मुलीवर सामूहिक बलात्कार

पोलिसांकडून धर्मांध आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न

  • भारत आणि पाक दोन्ही देशांचे पोलीस हिंदूंवर अत्याचार करणार्‍यांनाच वाचवतात, हे लक्षात घ्या ! भारतातील अशा पोलिसांना पाकमध्ये पाठवल्यास त्यांना वेगळे वाटणार नाही !
  • भारतात अल्पसंख्यांक धर्मांध हे हिंदूंवर अत्याचार करतात, तर पाकमध्ये बहुसंख्य धर्मांध हे अल्पसंख्य हिंदूंवर अत्याचार करतात, म्हणजेच धर्मांध अल्पसंख्यांक असले काय किंवा बहुसंख्य असले काय, ते हिंदूंवर अत्याचारच करतात !
  • ‘अल्पसंख्यांकांशी कसा व्यवहार करायचा, हे आम्ही मोदी यांना दाखवून देऊ’, अशी दर्पोक्ती करणारे पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांना असाच व्यवहार अपेक्षित आहे का ?
  • इस्लामी देशांतील अल्पसंख्यांक हिंदूंसाठी पंतप्रधान मोदी कधी कृती करणार ?

कराची – पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील तांडो महंमद खान जिल्ह्यात १३ वर्षांच्या अल्पवयीन हिंदु मुलीचे दोन धर्मांधांनी अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी या दोघांना अटक केली आहे; मात्र पोलिसांनी आरोपींना वाचवण्यासाठी त्यांच्यावर कठोर कलमे लावलेली नसल्याचे सांगितले जात आहे. तसेच त्यांना साहाय्य करणार्‍या अन्य आरोपींनाही वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप करण्यात येत आहे.

१. ही मुलगी धान्य आणण्यासाठी दुकानात गेली होती. तेव्हा २ जणांनी तिला हटकले. नंतर तिला पळवून नेले आणि तिला बळजबरीने दारू पाजली. नंतर तिच्यावर सामूहिक बलात्कर करून तिला तेथेच टाकून पळून गेले.

२. बराच वेळ झाला तरी मुलगी घरी न आल्याने तिच्या वडिलांनी तिचा शोध घेतल्यावर ती एका मैदानात अत्यंत दयनीय अवस्थेत सापडली. तिला तातडीने रुग्णालयात भरती करण्यात आले. तेव्हा तिच्यावर बलात्कार झाल्याचे उघड झाले.

३. पीडित मुलीला न्याय मिळेल, असे आश्‍वासन सिंध प्रांतांच्या मुख्यमंत्र्यांचे सल्लागार मुर्तझा वहाब यांनी दिले आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now