शिनजियांग (चीन) येथे ईदपूर्वी मशीद उद्ध्वस्त

चीनमध्ये जिहादी आतंकवाद निर्माण होऊ नये; म्हणून चीन प्रयत्नरत आहे. त्याला विरोध करणार्‍यांना चीन कठोर शिक्षा करत आहे. त्यामुळे चीन अद्याप या संकटापासून सुरक्षित आहे. भारत चीनकडून याविषयी काही शिकेल, तो सुदिन !

शिनजियांग (चीन) – ईदच्या आधी काही दिवस येथील हेयितका मशीद चीन सरकारकडून पाडण्यात आल्याची घटना आता समोर आली आहे. उपग्रहांद्वारे काढण्यात आलेल्या छायाचित्रांतून समोर आले आहे की, येथील होतन शहरामध्ये वर्ष २०१७ पासून आतापर्यंत मुसलमानांच्या ३६ हून अधिक मशिदी आणि अन्य धार्मिक स्थळे पाडण्यात आली आहेेत. ज्या मशिदी अद्याप सुरक्षित आहेत, तेथे धातूशोधक यंत्रणा लावण्यात आल्या आहेत. मशिदीमध्ये जाण्यापूर्वी सुरक्षारक्षकांकडून प्रत्येकाची झडती घेतली जाते. तसेच या परिसरामध्ये ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. (काश्मीरमध्ये ईदच्या आणि प्रत्येक शुक्रवारच्या नमाजानंतर काही ठिकाणी सैनिकांवर दगडफेक केली जाते, तसेच इस्लामिक स्टेट, पाकिस्तान आदींचे झेंडे फडकावले जातात आणि सरकार त्याकडे निष्क्रीयपणे पहाते, ही स्थिती आहे. भारत चीनकडून कठोरता कधी शिकणार ? – संपादक)

१. ईदच्या दिवशी चीनच्या सर्वांत मोठ्या ईदगाह मैदानामध्ये दिवसभरात केवळ १०० वयस्कर मुसलमानच नमाजपठणासाठी आले होते. येथे मोठ्या संख्येने सुरक्षारक्षक तैनात होते. तसेच आजूबाजूच्या परिसरातही सुरक्षारक्षक होते.

२. चीनच्या ‘ला त्रोबे विश्‍वविद्यालया’मधील विशेषज्ञ जेम्स लीबोल्ड यांनी म्हटले की, सत्ताधारी कम्युनिस्ट पक्ष ‘धर्म म्हणजे संकट आहे’, असे समजतो. तो गेल्या अनेक वर्षांपासून मुसलमानांना धर्मनिरपेक्ष बनवू पहात आहे.


Multi Language |Offline reading | PDF