अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनातील वक्त्यांचे उद्बोधक विचार आणि हिंदुत्वनिष्ठांचे मनोगत

वर्ष १९४७ मध्ये देशाचे विभाजन नव्हे, तर शिरच्छेद झाला ! – डॉ. के.व्ही. सितारामैया, संस्थापक, शक्ती केंद्रम्, गुंटूर, आंध्रप्रदेश.

‘या हिंदुभूमीवर धर्मसंस्थापना व्हावी, हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, हे माझे लक्ष्य आहे आणि या करताच मी जीवन जगत आहे. मानवजातीचा आधार सनातन धर्म आहे. जेव्हा जेव्हा अधर्म माजला, तेव्हा प्रत्येक वेळी भगवंताने धर्मसंस्थापना केली. वर्ष १९४७ मध्ये देशाचे विभाजन नव्हे, तर शिरच्छेद झाला. पंडित नथुराम गोडसे यांचे चरित्र वाचल्यानंतर माझे जीवन पालटून गेले. त्यानंतर मी कधी मागे वळून पाहिले नाही. मी एकटे कार्य केले. रामकृष्ण यांच्यावर पुस्तके लिहून आमचा क्षात्रधर्म काय आहे, हे जगासमोर आणले. सत्याला स्पर्श केल्याने आणि धर्माला वंदन केल्याने ईश्‍वर सदा आपल्या समवेत असतो. सत्याची उपासना केल्याने ईश्‍वराची कृपा होते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अधिवेशनाच्या माध्यमातून विश्‍वरूपाचे दर्शन घडवले. मी एकटा नाही, तर लक्षावधी हिंदू माझ्या समवेत आहेत. ‘धर्मसंस्थापना निश्‍चित होईल आणि हिंदु राष्ट्र येईल’, असा मला विश्‍वास आहे.’

सनातनचा आश्रम म्हणजे देवलोक !

‘‘सनातनचा आश्रम म्हणजे देवलोक आहे. त्याविषयी बोलण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत. प्रेम कसे असते ? भक्ती कशी असते, हे मला येथे शिकायला मिळाले. मी बाहेरचे जीवनच विसरून गेलो’, असे मनोगत डॉ. के.व्ही. सीतारामैया यांनी सनातन आश्रमाविषयी व्यक्त केले.

ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांच्या आधारावरच हिंदु राष्ट्र उभे राहील ! – पू. अशोक पात्रीकर, धर्मप्रसारक, सनातन संस्था

‘मनुष्यजन्माचे साध्य आणि सार्थक ईश्‍वरप्राप्तीमध्ये आहे. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी साधना करणे आवश्यक आहे. साधना केल्याने व्यक्ती धर्मनिष्ठ बनते. साधना करणाराच धर्माचा पाईक असतो. साधना करणार्‍यालाच ईश्‍वराकडून साहाय्य मिळते आणि आनंदप्राप्ती होते. साधनेने सत्त्वगुणाची वृद्धी होते आणि चैतन्य प्राप्त होऊन वाणी चैतन्यमय होते. ईश्‍वरप्राप्तीविना हिंदु राष्ट्राची स्थापना अशक्य आहे. राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यासाठी ईश्‍वरी शक्तीची आवश्यकता असते. त्यासाठी साधना करणे आवश्यक आहे. कलियुगामध्ये नामजप ही सर्वश्रेष्ठ साधना आहे. साधकांचे व्यष्टी ध्येय मोक्षप्राप्ती आहे, तर समष्टी ध्येय हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हे आहे. क्षात्रतेज आणि ब्राह्मतेज यांच्या आधारावरच हिंदु राष्ट्र उभे राहील.’

सर्व हिंदु बांधवांना साधना शिकवण्याचा प्रयत्न करीन ! – योगेश भोकरे, हिंदु धर्माभिमानी, धुळे

‘धर्मकार्य सर्व करतात. आम्हीही ‘लव्ह जिहाद’, गोहत्या यांच्या विरोधात कार्य  करत होतो; आमच्या या कार्यात अनेक अडथळे निर्माण केले जायचे. आमची साधना नसल्यामुळे हे होत असल्याचे आमच्या लक्षात आले. आम्हाला वाटायचे आम्हीच धर्मकार्य करतो. जेव्हा सनातनच्या आश्रमात आलो, तेव्हा येथे अनेक लहान लहान मुले नम्रपणे पूर्णवेळ सेवा करतांना पाहून थक्क झालो. आम्हाला येथे येण्याची संधी मिळाली, हे आमचे भाग्य समजतो. यापुढे सनातनची मानहानी आम्ही सहन करणार नाही. अधिवेशन आणि आश्रम आमच्यासाठी ‘पावरहाऊस’ आहेत. आम्ही येथून आध्यात्मिक शक्ती घेऊन जाणार आहोत. धर्मकार्य करतांना साधना करणे आवश्यक आहे. त्यामुळे मी सर्व हिंदु बांधवांना साधना शिकवण्याचा प्रयत्न करीन. आज हिंदूंची साधना अल्प आहे; म्हणून राममंदिर उभारले जात नाही.’

परात्पर गुरु डॉ. आठवले हिंदु राष्ट्राचे निर्माते आहेत ! – योगेश भोकरे

‘परात्पर गुरु डॉ. आठवले हिंदु राष्ट्राचे निर्माते आहेत. ते अतिशय साधे आहेत. ते स्वत:ला नमस्कारही करू देत नाहीत. त्यांना कोणताही अहं नाही. प्रसिद्धीची अपेक्षा नाही. आमच्या शहरात मोठमोठ्या हिंदु राष्ट्र जागृती सभा झाल्या; पण कुठेही त्यांचा फलक दिसला नाही.’

राष्ट्र आणि धर्म यांच्या उत्थानासाठी साधना करणे आवश्यक ! – विधीपूजन पांडे, अयोध्या, उत्तरप्रदेश

‘मी हिंदु धर्माचे कार्य करत असतांना हिंदुत्वाषियी कधीच तडजोड केली नाही आणि पुढेही करणार नाही. पुढे मला राष्ट्र आणि धर्म यांच्या उत्थानासाठी साधना करणे आवश्यक असल्याचे लक्षात आले. मी साधना चालू केली. तेव्हा ‘प्रेम, सद्भाव, बंधुत्व इत्यादी गुण गुरुकृपेनेच प्राप्त होतात’, हे लक्षात आले. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून सांगण्यात येणारी साधना केल्याने जीवनात परिवर्तन झाले. भगवान श्रीकृष्णाच्या चरणी समर्पित झाल्याने सर्वच प्राप्त झाले. गुरु, संत यांच्यावर विश्‍वास ठेवून सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याशी स्वत:ला जोडून आपल्याला हिंदु राष्ट्राची स्थापना करायची आहे.’

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडे विशाल मन आहे ! – गणेश लंके, अध्यक्ष, पेशवा युवा मंच, सोलापूर

‘सिंहाला सर्व घाबरतात; परंतु त्याचे बछडे त्याच्याशी सहजपणे खेळतात. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचा आधार ईश्‍वर आहे. आपल्या संघटनेच्या व्यासपिठावरून दुसर्‍या संघटनेच्या प्रमुखांचे भाषण ऐकण्यासाठी विशाल मन लागते आणि हे या दोन्ही संघटनांजवळ आहे. प्रत्येक मनुष्याचे अंतिम लक्ष्य मोक्ष असतेे; मात्र आमचे अंतिम लक्ष्य ‘हिंदु राष्ट्र’ आहे. जीवनात सत्संग महत्त्वाचा आहे, हे अनेक संतांनी सांगितले होते. याचा प्रत्यक्ष अनुभव मी या अधिवेशनात घेतला. हिंदु राष्ट्राची प्रत्यक्ष प्रतिकृती रामनाथी येथील सनातनचा आश्रम आहे. येथे भेट दिल्यानेे वर्षभर धर्मासाठी लढण्यासाठी बळ मिळते.’

हिंदूंनी त्यांच्या दिवसाचा प्रारंभ साधनेने केला पाहिजे ! – कु. अनन्या पंडा (अधिवक्ता रमेश पंडा, संस्थापक अध्यक्ष, कलिंग आश्रम, ओडिशा यांची मुलगी)

‘आम्ही सर्वधर्मसमभाव मानतो’, हा आमचा मोठेपणा आहे, न्यूनपणा नाही. आम्ही शीर झुकवू शकतो, तसे ते वर उठवू पण शकतो. इतर धर्मीय त्यांचे धर्मपालन कटाक्षाने करतात. हिंदूंनीही प्रतिदिन मंदिरात गेले पाहिजे आणि त्यांच्या दिवसाचा प्रारंभ साधनेने केला पाहिजे. देशात ७ लाख गावे आहेत, तर किमान १४ लाख लोकांना तरी आपण आपल्याशी जोडू शकतो.’

‘आम्ही एक कुटुंब आहोत’, असा सनातनच्या साधकांमध्ये भाव आहे ! – कु. अनन्या पंडा

‘येथे मी माझा भ्रमणभाषसंच बंद ठेवला होता. ‘सनातनच्या आश्रमात आल्यावर मी माझ्याच घरी परतले आहे’, असे वाटले. येथे ‘आम्ही एक कुटुंब आहोत’, असा सर्वांमध्ये भाव होता. अधिवेशनात कोणतीच त्रुटी दिसली नाही. प्रत्येकाच्या चेहर्‍यावर हास्य असून प्रत्येक जण नम्र होता.’

हिंदु राष्ट्र अधिवेशनामुळे देशात वैचारिक क्रांती होणार ! – आलोक तिवारी, जांबाज-ए-हिंद, राजस्थान

‘हिंदु राष्ट्राचे प्रत्यक्ष स्वरूप अधिवेशनाच्या याच सभागृहात पहायला मिळाले. सर्वांमध्ये एक वेगळे हास्य आणि नम्रता दिसली. हिंदु राष्ट्र येणे आवश्यक आहे. हिंदु राष्ट्र अधिवेशनामुळे देशात निश्‍चितपणे वैचारिक क्रांती होणार आहे. राजकीयदृष्ट्या हिंदू जागृत झाले आहेत; मात्र वैचारिक जागृती अजूनही बाकी आहे. ही वैचारिक जागृती येथून गेल्यावर आम्ही करणार आहोत.’

प्रयागराजमध्ये हिंदु जनजागृती समितीने मोठे कार्य केले ! – श्री. आलोक तिवारी

‘प्रयागराजमध्ये आमची सेवा समिती होती. तिच्या माध्यमातून सर्व भक्तगणांची १ मास सेवा केली; परंतु हिंदु जनजागृती समितीने आमच्याहून कितीतरी अधिक मोठे कार्य केले.’

सनातन आश्रमातील प्रत्येक साधक हिंदु राष्ट्र जगत आहे ! – करुणापती दुबे, भदोही, उत्तरप्रदेश

‘हिंदु राष्ट्र कसे असेल, हे आश्रम पाहिल्यावर समजते. सनातनचा आश्रम हिंदु राष्ट्राची एक प्रतिकृती आहे. ‘आश्रमातील प्रत्येक साधक हिंदु राष्ट्र जगत आहे’, असे वाटते. सर्वजण सत्त्वगुणी झाले की, सर्व आपोआपच घडते, हे गुरुकृपेमुळे शिकायला मिळाले. ‘या अधिवेशनामध्ये सर्व संघटना एका छत्रछायेखाली येऊन कार्य करत आहेत’, असे उदाहरण मी प्रथमच पहात आहे. आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी सर्वांनी सिद्ध झाले पाहिजे.’

 कट्टर हिंदूच हिंदु राष्ट्राची संकल्पना पूर्ण करणार ! – डॉ. महेंद्रसिंह बुंदेला, हिंदु सेवा संघ, जबलपूर, मध्यप्रदेश

‘हिंदु जनजागृती समितीने देशभरातील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांना एका माळेत गुंफले आहे. हिंदु सेवा संघ राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करतो. संघटनेने विशाल गदा यात्रेचे आयोजन केले होते. त्यात १५ सहस्रांहून अधिक कट्टर हिंदू सहभागी झाले होते. आमच्या संघटनेत मुले कट्टर होतात; म्हणून हिंदू त्यांच्या मुलांना आमच्या संघनेत येण्यापासून थांबवतात; परंतु कट्टर हिंदूच हिंदु राष्ट्राची संकल्पना पूर्ण करणार आहेत.’

व्यवसाय करतांनाही धर्मकार्य आणि साधना करू शकतो ! – अभिजित महाजन, नांदेड, महाराष्ट्र

‘आपण नामजप केला, तर जीवनात संघर्ष करू शकतो. साधनेशिवाय जीवन अपूर्ण आहे. प.पू. गुरुदेवांच्या कृपेने मी साधना चालू केली. सद्गुरु स्वाती ताई यांच्याकडून सेवेत सहभागी होण्याची प्रेरणा मिळाली. मी १०१ साप्ताहिक सनातन प्रभातचे वर्गणीदार करण्याचे लक्ष्य पूर्ण केले. आपण व्यवसाय करतांनाही धर्मकार्य आणि साधना करू शकतो, हे लक्षात आले. अर्पण करण्यासाठी सनातन संस्था हे योग्य ठिकाण आहे.’

मी हिंदु राष्ट्रासाठी जगणार आणि हिंदु राष्ट्रासाठीच मरणार ! – श्रीमती राणु बोरा, स्वामी विवेकानंद केंद्र, आसाम

‘आश्रमात कणाकणामध्ये चैतन्याची अनुभूती आली. हिंदु जनजागृती समितीशी जुळल्यापासून हिंदु धर्माचे कार्य करण्याचा मार्ग मिळाला. आसामच्या ९ मुसलमानबहुल जिल्ह्यांमध्ये हिंदु धर्माचे कार्य करणे कठीण आहे; परंतु गुरुकृपेनेच हिंदु धर्माचे कार्य करत आहे. मी हिंदु राष्ट्रासाठी जगणार आहे आणि हिंदु राष्ट्रासाठीच मरणार आहे.’

क्षणचित्रे

१. समस्त हिंदुत्वनिष्ठांना हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रेरणा देणारे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अद्वितीय गुणांचा परिचय सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी या अधिवेशनात करून दिला.

२. हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ते श्री. अरविंद पानसरे यांनी या हिंदु राष्ट्र अधिवेशनाला प्रसिद्धी माध्यमांकडून मिळालेल्या प्रसिद्धीचा आढावा उपस्थितांसमोर सादर केला.


Multi Language |Offline reading | PDF