हिंदूंनो, भारतद्वेषी धर्मांधांचा इतका पुळका कशासाठी ?

पू. गुरुनाथ दाभोलकर

‘भारत भाग्यविधाता’ आणि ‘वन्दे मातरम्’ या शब्दांनी धर्मांधांच्या धार्मिक भावना दुखावतात; म्हणून अलाहाबादमधील ‘एम्.ए.’ स्कूलमध्ये गेल्या काही वर्षांत राष्ट्रगीत म्हटले गेलेले नाही. हे वृत्त दैनिक सनातन प्रभातमध्ये वाचले आणि चीड आली. या पवित्र भूमीत ‘भारत भाग्यविधाता’ आणि ‘वन्दे मातरम्’ हे राष्ट्रप्रेमी शब्द उच्चारणे म्हणजे ‘विषाचा घोट घेणे’, असे काहींना वाटते, अगदी महापापही वाटते. अशांना या भूमीत, या राष्ट्रात रहाण्याचा काय अधिकार आहे ? त्यांनी पाकिस्तानात जावे. राष्ट्रगीतावर बहिष्कार घालण्याचे धाडस यांना होते तरी कसे ?

गेल्या ७१ वर्षांत या सर्वांचे हट्ट आणि लाड पुरवण्याचे महापाप, महाअपराध राज्य करणार्‍या सर्वपक्षीय राज्यकर्त्यांचेच आहे. ‘सारे केवळ मतांसाठी’ ही लाचारी कितपत सहन करणार ? छत्रपती शिवाजी महाराज यांनी वाई प्रांतातील प्रतापगडावर त्या क्रूरकर्मा अफझलखानाचा कोथळा काढून गडाच्या पायथ्याशी त्याला गाडले, तेथे त्याच्या बांधलेल्या थडग्यासमोर गुडघे टेकून आमचेच हिंदु बांधव मूल होण्यासाठी तेथे नवस बोलतात. असे घडल्यास त्या अर्भकाच्या अंगी कोणाचे (अव)गुण येणार ?

अशा राष्ट्रघातकी प्रवृत्तींना वटणीवर आणण्याचा एकच उपाय म्हणजे हिंदु राष्ट्राची निर्मिती होय. ते लवकर येण्यासाठी आपण सारे कटीबद्ध होऊया.

– (पू.) श्री. गुरुनाथ दाभोलकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.


Multi Language |Offline reading | PDF