आजच्या शासनकर्त्यांचे स्वार्थी ‘राजकारण’, तर परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे निःस्वार्थी ‘राष्ट्रकारण’!

पू. संदीप आळशी

‘स्वार्थी वृत्ती, सत्तापिपासूपणा, असत्यता आदी दुष्प्रवृत्तींच्या आधारे केले जाते, ते सध्याचे ‘राजकारण’. याउलट निःस्वार्थी वृत्ती, देशभक्ती, धर्माधिष्ठितता, सत्यता, आदर्श राज्यव्यवस्था निर्माण करण्याची तळमळ आदी सत्प्रवृत्तींच्या आधारे केले जाते, ते ‘राष्ट्रकारण’. आज निधर्मी शासनकर्ते स्वार्थी राजकारण करत आहेत, तर हिंदूंपुढे रामराज्यासम आदर्श असणार्‍या हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे ध्येय ठेवणारे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले हे राष्ट्रकारण करत आहेत !

जे राजकारण दुष्प्रवृत्तींच्या आधारे केले जाते, त्याच्या बळावर उभे राहिलेले राष्ट्र अधिक काळ टिकू शकत नाही. याउलट राष्ट्रकारण सत्प्रवृत्तींच्या आधारे केले जात असल्यामुळे राष्ट्रकारणाच्या बळावर उभे राहिलेले राष्ट्र दीर्घकाळ टिकते. हिंदु राष्ट्रही असेच दीर्घकाळ टिकेल. यासाठीच ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला पर्याय नाही’, हे ओळखून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी एकवटून प्रयत्न करूया !’

– (पू.) श्री. संदीप आळशी (२४.५.२०१९)


Multi Language |Offline reading | PDF