‘अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल’ने भीमा कोरेगाव हिंसेतील आरोपींना ‘हिरो’ ठरवले !

आरोपींची सुटका करण्याची पंतप्रधानांकडे मागणी

  • या प्रकरणात शहरी नक्षलवाद्यांचा समावेश आहे आणि त्यांच्या सुटकेची मागणी करणारी संघटनाही नक्षलवादी आहे, असे घोषित करून अशा कायदाद्रोही संघटनांवर भाजप सरकारने तात्काळ बंदी घातली पाहिजे !
  • मालेगाव , समझौता एक्सप्रेस, मडगाव आदी स्फोट प्रकरणात निरपराध हिंदूंना अटक करून त्यांना आतंकवादी ठरवण्याचे प्रयत्न झाले, तेव्हा ‘अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल’ने त्यांच्या सुटकेची मागणी का केली नाही ?

नवी देहली – खाजगी मानवाधिकार संघटना ‘अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल’ने ‘भीमा कोरेगाव हिंसेच्या प्रकरणात अटक करणार्‍यांची सुटका करावी’, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. या संघटनेने या आरोपींना ‘हिरो’ म्हटले आहे.

१. ‘अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल’चे म्हणणे आहे की, मानवाधिकार कार्यकर्त्यांवर होणारी आक्रमणे देशासाठी चांगली नाहीत. याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य करायला हवे; कारण जग त्याच्या प्रतीक्षेत आहे.

२. याविषयी महाराष्ट्राचे मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, जर ‘अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल’ने आरोपींना हिरो ठरवले असेल, तर हे गंभीर आहे. सरकार यावर लक्ष देईल. गृहखाते याकडे पाहील.


Multi Language |Offline reading | PDF