(म्हणे) ‘जातीभेद नष्ट झाल्यावर भारत विश्‍वगुरु होईल !’- सरसंघचालक

अशा मानसिक स्तरावरील कृतींमुळे नाही, तर आध्यात्मिक स्तरावर कार्य केल्याने भारत विश्‍वगुरु होईल. चैतन्यभूमी असलेल्या भारतात मोक्षाची वाट दाखवणारे अनेक संत होते. त्यामुळे जगभरातील जिज्ञासू आणि मुमुक्षू भारतात येत. भारत आध्यात्मिकदृष्ट्या संपन्न होता; म्हणून तो विश्‍वगुरु होता ! हे लक्षात घेऊन सरसंघचालकांनी भारताला आध्यात्मिकदृष्ट्या संपन्न करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – जेव्हा देशात उच्चनीच, जातपात आदी भेदभाव संपतील, तेव्हा भारत सशक्त होईल आणि विश्‍वगुरु होईल, असा विश्‍वास सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केला. ते उत्तरप्रदेशच्या शामली येथे संघाच्या बौद्धिक सत्रात बोलत होते. भागवत म्हणाले की, भारत आपली माता आहे. भारताला माता मानाणारे सर्व भाऊ झाले, तर त्यांच्यात वैर कसले? (अशी स्थिती कोण आणि कशी निर्माण करणार ? देशात अल्पसंख्यांकांकडून भारताला माता मानले जात नाही, त्यांच्याकडून हिंदूंवर अत्याचार होत असतांना ते हिंदूंना भाऊ मानतील, अशी अपेक्षा कशी करू शकतो ? – संपादक)

चांगली व्यक्ती होण्यासाठी शिक्षण आणि संस्कार असले पाहिजेत. सशक्त भारतासाठी आपण संकल्प केला पाहिजे आणि त्याचे कठोर पालन केले पाहिजे. (संकल्प पूर्ण होण्यासाठी त्यामागे आध्यात्मिक बळ असावे लागते आणि ते बळ साधनेने मिळवले जाते. तसे बळ नसतांना केलेला संकल्प कधीही पूर्णत्वाला जात नाही ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF