हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘हिंदु राष्ट्र संघटक प्रशिक्षण आणि अधिवेशना’चा उत्साहपूर्ण वातावरणात समारोप

हिंदु राष्ट्रासाठी झोकून देण्याचा हिंदुत्वनिष्ठांचा निर्धार !

विद्याधिराज सभागृह (रामनाथ देवस्थान), रामनाथी (गोवा), ८ जून (वार्ता.) – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या अंतर्गत ‘हिंदु राष्ट्र संघटक प्रशिक्षण आणि अधिवेशना’चा ८ जून या दिवशी उत्साहपूर्ण वातावरणात समारोप झाला. देशातील विविध राज्यांतून २५० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ या अधिवेशनात सहभागी झाले होते. उपस्थित हिंदुत्वनिष्ठांनी ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’चा गजर करत हिंदु राष्ट्रासाठी झोकून देण्याचा निर्धार व्यक्त केला.

घोषणा देतांना हिंदुत्वनिष्ठ

५ जूनपासून चालू झालेल्या या अधिवेशनात ‘वेळेचे नियोजन कसे करावे ?’ ‘निर्णयक्षमतेचा विकास कसा करावा ?’ ‘धर्मकार्य समर्पित भावानेे कसे करायचे ?’ ‘हिंदु राष्ट्राच्या संदर्भात जागृती करण्यासाठी कोणत्या प्रकारचे उपक्रम आयोजित करावेत ?’ तसेच ‘धर्मकार्य करतांना साधनेचे अधिष्ठान ठेवण्याचे महत्त्व’ आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित हिंदुत्वनिष्ठांनी धर्मकार्य करतांना येणार्‍या समस्या मोकळेपणाने मांडल्या. त्यावर कोणत्या उपाययोजना आखायला हव्यात, यांविषयीही त्यांना अवगत करण्यात आले. ४ दिवसांच्या या अधिवेशनामध्ये सर्वांमध्येच आपलेपणाची आणि कुटुंबभावना निर्माण झाली होती.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now