सोलापूर येथे शिवराज्याभिषेक सोहळ्यात ‘शिवगौरव’ पुरस्कार वितरण !

सामाजिक कार्यकर्ते सुधाकर बहिरवाडे आणि संजय साळुंके यांना ‘शिवगौरव’ पुरस्कार

सोलापूर, ८ जून (वार्ता.) – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त सामाजिक कार्य करणारे सुधाकर बहिरवाडे आणि संजय साळुंके यांना ‘शिवगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सुवर्ण गणपति युवक प्रतिष्ठान आणि हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान यांच्या वतीने शिवस्मारक येथे शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार देण्यात आला.

या वेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, शिवसेना जिल्हाप्रमुख महेश कोठे, उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, नगरसेवक राजकुमार हंचाटे, महेश धाराशिवकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला.

या वेळी सुवर्ण गणपति युवक प्रतिष्ठान आणि हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान यांच्या वतीने शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या उत्सव मूर्तीला मंत्रोच्चार करत पंचामृताने अभिषेक करण्यात आला.


Multi Language |Offline reading | PDF