भारताची हास्यास्पद लोकशाही आणि हिंदु राष्ट्राची आवश्यकता !

पू. संदीप आळशी

‘अभियांत्रिकी, वैद्यकीय, बांधकाम, कला अशा प्रत्येक क्षेत्रात काम करता येण्यासाठी संबंधित विषयांचे शिक्षण असणे आवश्यक असते. याउलट सध्याच्या भारतीय लोकशाही व्यवस्थेत निवडून येणार्‍या मंत्र्याला शासनाचे एखादे खाते चालवण्यासाठी त्या खात्याशी संबंधित विषयाचे शिक्षण असण्याची अट नाही ! एखाद्या मर्यादित क्षेत्रात काम करता येण्यासाठीही जेथे शिक्षण असणे आवश्यक असते, तेथे संपूर्ण राज्य किंवा देश चालवणार्‍या राज्यकर्त्यांना त्यासंबंधीचे शिक्षण असणे अनिवार्य नाही, हे मुळातच तर्कहीन आणि हास्यास्पद आहे. आज इतक्या वर्षांत भ्रष्टाचार, बेरोजगारी, गरिबी आदी सूत्रांवरून देशाची जी अतोनात अधोगती झाली आहे, त्याला ‘राज्यकर्त्यांनी समर्थपणे देशाचा कारभार न चालवणे’, हेही एक मुख्य कारण आहे.

भावी हिंंदु राष्ट्रात राज्यकर्त्यांना राजधर्म, अर्थ, न्याय, वाणिज्य आदी सर्वच क्षेत्रांतील शिक्षण दिले जाईल. त्यामुळे हिंदु राष्ट्र हे रामराज्यासारखेच आदर्श असेल. यासाठी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेकरता एकवटून प्रयत्न करूया !’

– (पू.) श्री. संदीप आळशी (३०.५.२०१९)


Multi Language |Offline reading | PDF