पहाटेच्या अजानसाठी ध्वनीक्षेपक न वापरण्याचा आल्तो-दाबोळी येथील मशीद व्यवस्थापनाचा निर्णय

  • इस्लाम धर्म स्थापन झाला, त्या वेळी म्हणजे १३०० वर्षांपूर्वी ध्वनीक्षेपक नव्हता. मग अजानाच्या वेळी ध्वनीक्षेपक न वापरल्याने इस्लाम धर्माची हानी कशी काय होणार ? त्यामुळे सर्वत्रचे मशीद व्यवस्थापक असा निर्णय घेतील का ? तसेच शासनही अजानसाठी ध्वनीक्षेपक न वापरण्याचा निर्णय घेऊन ध्वनीप्रदूषण रोखेल का ?
  • आल्तो-दाबोळी येथील मशीद व्यवस्थापन केवळ पहाटेच्या नव्हे, तर सर्वच वेळच्या अजानसाठी ध्वनीक्षेपक न वापरण्याचा निर्णय का घेत नाही ?

वास्को, ७ जून (वार्ता.) – मुसलमान सोडून अन्य धर्मीयांची पहाटेची झोप खंडित होत असल्याच्या तक्रारींमुळे आल्तो-दाबोळी येथील मशीद-ई-नूर या मशिदीच्या व्यवस्थापनाने पहाटे अजानसाठी ध्वनीक्षेपक न वापरण्याचा निर्णय घेतला आहे. मशीद-ई-नूर या मशिदीचे एक विश्‍वस्त इक्बाल मोहिदीन यांनी ही माहिती प्रसारमाध्यमांनी दिली आहे.

इक्बाल मोहिदीन म्हणाले, मशिदीच्या शेजारी रहाणार्‍या गैरमुसलमान व्यक्तींनी त्यांची पहाटेची झोप मशिदीतील अजानमुळे खंडित होत असल्याच्या तक्रारी मशिदीच्या व्यवस्थापनाकडे केल्या. यामुळे मशिदीच्या व्यवस्थापनाने पहाटे अजानला ध्वनीक्षेपक न वापरण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या शेजार्‍यांना त्रास देऊन आम्ही काहीच मिळवू शकणार नाही. प्रार्थना ही खरी तर आतून आली पाहिजे. या निर्णयामुळे शेजार्‍यांनी मशीद व्यवस्थापनाचे कौतुक केले असून हे एक सकारात्मक पाऊल असल्याचे म्हटले आहे. (असेच पाऊल अन्य मशीद व्यवस्थापकांनी उचलल्यास देशात खरा धार्मिक सलोखा निर्माण होईल ! – संपादक)

प्राप्त माहितीनुसार मशिदीच्या या निर्णयाला मुसलमानांकडून प्रारंभी विरोध झाला; मात्र त्यांना मशिदीच्या व्यवस्थापनाकडून शेजार्‍यांसमवेत सामाजिक बांधिलकी अधिक महत्त्वाची असल्याचे मुसलमानांना पटवून देण्यात आले.

(म्हणे) गैरमुसलमानांनी अजानमुळे प्रेरणा मिळते, असे सांगितले !

मुसलमानांचा कावेबाजपणा ओळखा !

इक्बाल मोहिदीन पुढे म्हणाले, आम्ही पहाटे अजानाच्या वेळी ध्वनीक्षेपक वापरणे बंद केल्यानंतर गैरमुसलमान लोकांनीच आम्हाला ध्वनीक्षेपक वापरणे का बंद केले असे विचारले ? या अजानमुळे त्यांना प्रेरणा मिळते, असे त्यांचे म्हणणे होते; मात्र समाजहित या व्यापक हेतूने आम्ही निर्णय घेतल्याने आम्ही या निर्णयावर ठाम राहिलो. (हा जनतेच्या डोळ्यांत धूळ फेकण्याचा प्रयत्न आहे. गोव्यात आणि देशभरात अनेक ठिकाणी पहाटेच्या अजानच्या वेळी ध्वनीक्षेपक वापरण्याच्या विरोधात तक्रारी प्रविष्ट झाल्या आहेत; पण प्रशासनच लांगूलचालनापोटी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान होऊनही कारवाई करत नाही. अजानमुळे प्रेरणा मिळते असे सांगणारे अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करणारे तथाकथित धर्मनिरपेक्ष असणार, हे निश्‍चित ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF