बंगालमध्ये भाजपच्या विजयी मिरवणुकांवर तृणमूल काँग्रेस सरकारकडून बंदी

  • रमझानसाठी नवरात्रीच्या मिरवणुका दोन दिवस आधी घेण्याचा आदेश देणार्‍या ममता (बानो) बॅनर्जी यांनी अशी बंदी घातल्यास नवल ते काय ?
  • कायदा आणि सुव्यवस्थेच्या नावाखाली जर अशी बंदी घालण्यात येत असेल, तर तृणमूल काँग्रेसचे सरकारच याच कारणासाठी विसर्जित करण्याचे धाडस केंद्रातील भाजप सरकार कधी दाखवणार ?

कोलकाता – मला सूचना मिळाली आहे की, भाजपने विजयी मिरवणुकांच्या नावाखाली हुगली, बांकुरा, पुरुलिया आणि मिदनापूर जिल्ह्यांमध्ये गोंधळ घातला. आता अशी एकही विजयी मिरवणूक निघणार नाही. लोकसभा निवडणुकांचे निकाल लागून १० पेक्षा अधिक दिवस झाले आहेत. त्यामुळे आता कुठली विजयी मिरवणूक निघायला नको, अशा शब्दांत बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपच्या विजयी मिरवणुकांवर बंदी घातली आहे. तसेच या आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याचा आदेशही पोलिसांना दिला.


Multi Language |Offline reading | PDF