काश्मीरमध्ये चकमकीत ४ आतंकवादी ठार

ठार झालेले २ आतंकवादी हे पोलीस अधिकारी !

  • धर्मांधांची सुरक्षादलामध्ये भरती करणे, हे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने किती घातक आहे, हे यातून लक्षात येते. सैन्य, अन्वेषण यंत्रणा आदी महत्त्वाच्या क्षेत्रांत अल्पसंख्यांकांची भरती करण्याची मागणी करणार्‍या निधर्मीवाद्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?
  • जोपर्यंत आतंकवाद्यांचा निर्माता असलेल्या पाकला नष्ट केले जाणार नाही, तोपर्यंत काश्मीरमध्ये कितीही आतंकवाद्यांना ठार केले, तरी आतंकवाद संपणार नाही !

पुलवामा (जम्मू-काश्मीर) – येथे झालेल्या चकमकीत सुरक्षादलांनी ४ आतंकवाद्यांना ठार केले. त्यांच्याकडून शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे. यांतील २ आतंकवादी हे पोलीस अधिकारी होते आणि ते २४ घंट्यांपूर्वीच पोलिसांची शस्त्रे घेऊन जैश-ए-महंमद या आतंकवादी संघटनेमध्ये सहभागी झाले होते.

अनंतनागमध्ये आतंकवाद्यांकडून सैनिकाची हत्या

आतंकवाद्यांच्या आक्रमणात प्रतिदिन सैनिक हुतात्मा होऊ देणारा एकमेव देश भारत !

अनंतनाग( जम्मू-काश्मीर) – येथे ईदनिमित्त घरी आलेल्या प्रादेशिक सैन्यातील (‘टेरिटोरियल आर्मी’तील) मंजूर अहमद बेग या सैनिकाची आतंकवाद्यांनी त्यांच्या घरात घुसून हत्या केली. बेग हे राष्ट्रीय रायफल्सच्या ३४ व्या बटालियनशी जोडलेले होते.


Multi Language |Offline reading | PDF