रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात लावण्यात आलेल्या पणत्यांच्या ज्योती पिवळ्या आणि लाल रंगाच्या दिसणे !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने . . .

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने लावण्यात आलेल्या पणत्यांच्या ज्योती पिवळ्या आणि लाल रंगाच्या दिसणे !

स्वागतकक्षातील यज्ञकुंड परिसरात लावलेल्या पणत्यांच्या ज्योती पिवळ्या रंगात दिसत आहेत.

कलामंदिर परिसरात लावलेल्या पणत्यांच्या ज्योती लाल रंगाच्या दिसत आहेत.

‘दीपज्योतिःपरब्रह्म दीपज्योतिर्जनार्दनः ।
दीपो हरतु मे पापं दीपज्योतिर्नमोऽस्तु ते ॥

अर्थ : दिव्याचा प्रकाश परब्रह्मरूप आहे. दीपज्योती जगाचे दुःख दूर करणारा परमेश्‍वर आहे. दीपक माझे पाप दूर करो. हे दीपज्योती, तुला नमस्कार असो.

कु. प्रियांका लोटलीकर

या दुःखहारक दीपज्योतीच्या संदर्भात रामनाथी आश्रमातील साधकांना एक निराळी अनुभूती आली. ११.५.२०१९ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ७७ वा जन्मोत्सव सोहळा रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमात साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने आश्रमात सर्वत्र पणत्या लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला. या पणत्यांचे वैशिष्ट्य म्हणजे आश्रमाच्या स्वागतकक्षाजवळ लावण्यात आलेल्या पणत्यांच्या ज्योती पिवळ्या रंगाच्या दिसत होत्या, तर कलामंदिराकडे लावण्यात आलेल्या पणत्यांच्या ज्योती लाल रंगाच्या दिसत होत्या.

– कु. प्रियांका लोटलीकर, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा.

पणत्यांच्या ज्योती पिवळ्या अथवा लाल रंगाच्या दिसण्यामागील कारण

श्री. राम होनप

१. ज्ञानकण प्रक्षेपित करणार्‍या तारक स्वरूपातील पिवळ्या ज्योती !

अ. ‘अग्निनारायणाची दोन रूपे आहेत. पिवळ्या ज्योतीच्या स्वरूपात दिसणारे रूप तारक असते आणि लाल ज्योतीच्या स्वरूपात दिसणारे रूप मारक असते.

आ. पिवळ्या ज्योतीच्या माध्यमातून वातावरणाची शुद्धी होते आणि त्यातून ज्ञानकण सर्वत्र पसरतात. त्यातील सत्त्वगुणाची वृद्धी होते.

२. धर्मलढ्यास साथ देणार्‍या लाल रंगाच्या ज्योती !

अ. लाल ज्योतीच्या माध्यमातून वातावरणातील अशुद्धी नष्ट होते, म्हणजे वातावरणातील रज-तम नष्ट होण्यास साहाय्य होते. या कार्यासाठी पणतीतून लाल ज्योतीचे प्रकटीकरण झाले.

आ. पणतीची ज्योत लाल रंगाची दिसणे, हे धर्मलढ्यास अग्नितत्त्वाची साथ मिळत असल्याचे दर्शक आहे. कालांतराने धर्म-अधर्माच्या लढ्यात पंचतत्त्वांच्या सहभागाचे प्रमाण वाढत जाऊन अंती त्याचे रूपांतर हिंदु राष्ट्रात होईल.’

– श्री. राम होनप, सनातन आश्रम, गोवा. (३.११.२०१६)

सनातनच्या आध्यात्मिक संशोधनाकडे शिकण्याच्या दृष्टीने पहा !

‘सनातन आध्यात्मिक संशोधनाच्या दृष्टीकोनातून विविध बुद्धीअगम्य पालटांचा अभ्यास करत आहे. ‘जिज्ञासूच ज्ञानाचा अधिकारी असतो’, या उक्तीप्रमाणे साधनेमुळे होणार्‍या परिणामांकडे जिज्ञासू वृत्तीने पाहिले, शिकण्याची आणि विचारण्याची वृत्ती ठेवली, तरच ईश्‍वर या संदर्भातील अमूल्य ज्ञान देईल !


Multi Language |Offline reading | PDF