भूमी बळकावण्याच्या संशयावरून आदिवासींनी नमाजपठण करणार्‍या मुसलमानांना बाण मारून पळवून लावले !

  • केवळ भूमी बळकावण्याच्या संशयावरून आदिवासी हे धर्मांधांना हाकलून लावतात; मात्र देशातील भूमी, मंदिरे, इमारती आदी अनेक गोष्टी धर्मांधांनी, तसेच बांगलादेशी घुसखोर मुसलमानांनी बळकावल्या असतांना भाजप सरकार निष्क्रीय रहाते !
  • विनाअनुमती कोणाच्याही भूमीत जाऊन नमाजपठण करण्याचे धर्मांधांचे धाडस कसे होते ? बिहारमधील जनता दल (संयुक्त) आणि भाजप यांचे युतीचे सरकार अशांवर कारवाई का करत नाही ? त्यामुळे आदिवासींनी आक्रमण केले, तर त्यांना दोषी कसे ठरवणार ?

पाटलीपुत्र (बिहार) – बिहार-बंगाल राज्यांच्या सीमेवर धुलबरी गावात काही मुसलमान येथील चहाच्या मळ्यात नमाजपठणासाठी गेले होते. तेव्हा येथील आदिवासींना वाटले की, ते त्यांची भूमी बळकावण्यासाठी आले आहेत. त्यामुळे आदिवासींनी धनुष्य बाणांद्वारे मुसलमानांवर आक्रमण केले. या बाणांमुळे २३ मुसलमान घायाळ झाले. काहींच्या पोटात, छातीत, कमरेत, गुडघ्यात आणि इतर ठिकाणी बाण लागले. सर्व घायाळांना जवळच्या रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.


Multi Language |Offline reading | PDF