धर्मकार्यासाठी समर्पणभावाने कार्य करण्याची आवश्यकता ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

रामनाथी येथील हिंदु राष्ट्र संघटक प्रशिक्षण आणि अधिवेशन-दुसरा दिवस

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

विद्याधिराज सभागृह (रामनाथ देवस्थान), रामनाथी (गोवा), ६ जून (वार्ता.) – भारताची परंपरा त्यागाची आहे; पण राजकीय पक्षांनी मतांसाठी लालूच दाखवून नागरिकांमध्ये स्वार्थाची भावना निर्माण केली. स्वातंत्र्यपूर्व काळात नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दुंगा, असे आवाहन केले होते; पण आताचे राजकारणी आम्हाला मत द्या, आम्ही २ रुपयांत किलोभर तांदूळ  देऊ, असे आश्‍वासन देतात; पण हे लक्षात ठेवले पाहिजे की, जो धर्माचे कार्य समर्पणभावाने करतो, त्याचेच नाव इतिहासात अजरामर होते. आज समाजरूपी तराजू भौतिकतेकडे झुकला आहे, तो धर्माकडे झुकवायला हवा. जो समर्पणभावाने धर्मकार्य म्हणजे ईश्‍वरी कार्य करतो, त्याची काळजी साक्षात भगवंत घेतो. केवळ इतिहासकाळात धर्मासाठी त्याग करणारे धर्मवीर होते असे नाही, तर आजही श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष पू. संभाजी भिडे गुरुजी, हिंदु विधीज्ञ परिषदेचे सचिव आणि प्रखर धर्मनिष्ठ अधिवक्ता संजीव पुनाळेकर, श्रीराम सेनेचे श्री. प्रमोद मुतालिक यांसारखे धर्मवीर हिंदु धर्मरक्षणासाठी कार्यरत आहेत. ज्याप्रमाणे स्वातंत्र्यपूर्व काळात क्रांतीकारकांनी स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाचा त्याग केला; त्याप्रमाणे आज हिंदु राष्ट्रासाठी समर्पणभावाने कार्य करण्याची आवश्यकता आहे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी केले. हिंदु राष्ट्र संघटक प्रशिक्षण आणि अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी धर्मकार्य समर्पणभावाने करण्याची आवश्यकता, या विषयावर ते बोलत होते.

६ जून या दिवशी वेळेचे नियोजन कसे करावे, हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी जागृती आणि प्रशिक्षण उपक्रम कशा प्रकारे आयोजित करावेत आदी विषयांवरही मार्गदर्शन करण्यात आले. धर्मप्रेमींनी या वेळी सनातन के सम्मान मे, जय श्रीराम जय श्रीराम, अशा उत्स्फूर्त घोषणा दिल्या.


Multi Language |Offline reading | PDF