पोलीस अधिकार्‍यावर कारवाई करा ! – प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांची मागणी

गणवेषधारी पोलीस अधिकार्‍याकडून इस्लामी टोपी घालून मुसलमानांना ईदच्या शुभेच्छा !

तेलंगण राष्ट्र समितीचे सरकार मुसलमानांचे लांगूलचालन करते. त्यामुळे तेथील पोलीस दलही अशा प्रकारे त्यांचे लांगूलचालन करत असल्यास आश्‍चर्य नाही !

आमदार टी. राजासिंह

भाग्यनगर – तेलंगणमधील पोलीस अधिकार्‍याने जाळीदार टोपी घालून ईदच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी पोलिसांची टोपी काढून ठेवली आणि जाळीदार टोपी घालून ते पोलीस ठाण्यात बसले होते. ते दिवाळी आणि दसरा या दिवशी हिंदूंना अटक करतात. मी तेलंगणचे पोलीस महासंचालक आणि भाग्यनगरचे पोलीस यांना विचारू इच्छितो की, संबंधित पोलीस अधिकार्‍याला जाळीदार टोपी घालून पोलीस ठाण्यात बसण्याची अनुमती देण्यात आली आहे का?, असा प्रश्‍न येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांनी ट्वीट करून केला आहे. त्यांनी पोलीस अधिकार्‍यावर कारवाई करण्याची सरकारकडे मागणी केली आहे. यावर तेलंगण पोलिसांकडून प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही. (तेलंगण सरकारकडून अशा पोलिसांवर कारवाई नव्हे, तर त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले गेले, तर नवल वाटणार नाही ! – संपादक)

असदुद्दीन ओवैसी आतंकवाद्यांना अर्थपुरवठा करतात !

‘एम्आयएम्चे असदुद्दीन ओवैसी आतंकवाद्यांना पैसे देतात. त्यांच्या मतदारसंघात ७ सहस्रांहून अधिम मुसलमान रहातात. जुन्या शहरामधील लोक ओवैसी यांच्या विरोधात आहेत; कारण त्यांनी त्यांच्यासाठी काहीही केलेले नाही. वर्ष २०२४ मध्ये भाग्यनगरची लोकसभेची जागा भाजप जिंकेल आणि ओवैसी यांचा राजकीय अंत होईल’, असेही टी. राजासिंह म्हणाले.


Multi Language |Offline reading | PDF