काश्मीरमध्ये अशांतता निर्माण करण्यासाठी आयएस्आय आणि हाफिज सईद यांच्याकडून पैसे मिळत होते ! – आसिया अंद्राबी यांची स्वीकृती,

नवी देहली – काश्मीरमधील फुटीरतावादी संघटना दुख्तारन-ए-मिल्लतच्या नेत्या असिया अंद्राबी यांना राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने अटक केली आहे. त्यांच्या चौकशीतून त्यांनी पाकची गुप्तचर संस्था आयएस्आय आणि लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईद यांच्याकडून काश्मीरमध्ये हिंसाचार करण्यासाठी पैसे मिळत होते, अशी स्वीकृती दिली आहे.

अंद्राबी यांचा पुतण्या पाकिस्तानी सैन्यात कॅप्टन आहे, तर अन्य एक नातेवाईक पाक सैन्य आणि आयएस्आय यांच्या संपर्कात आहे. पाक सैन्याच्या एका अधिकार्‍याच्या माध्यमातून तिचा संपर्क हाफिज सईद यांच्याशी झाला होता. सईदकडून मिळण्यात येणारा पैसा काश्मीरमध्ये दगडफेक करणारे आणि फुटीरतावादी हुरियत कॉन्फरन्सच्या नेत्यांना वाटण्यात येत होते. तसेच अंद्राबी हिचे काही नातेवाईक दुबई आणि सौदी अरेबिया येथेही आहेत. त्यांच्याकडूनही तिला पैसे मिळत होते आणि ते ती याच कामासाठी वापरत होती.


Multi Language |Offline reading | PDF