अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाला उपस्थित हिंदुत्वनिष्ठांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट !

२७ मे ते ८ जून २०१९ या कालावधीत विद्याधिराज सभागृह, रामनाथी, गोवा येथे अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन चालू आहे. या अधिवेशनात सहभागी झालेल्या हिंदुत्वनिष्ठांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली आणि येथील कार्याची ओळख करून घेतली.

डावीकडून अमरावती येथील शिवधारा आश्रमचे साधक श्री. प्रकाश सिरवानी, विनितादीदी, पिंकिदीदी, विक्की तरुना, सागर पाहूजा, गौतम नवलानी, दिनेश कोटवानी, प.पू. (डॉ.) संतोष नवलानी यांना स्वागत कक्षातील सनातनचे श्रद्धास्थान संत भक्तराज महाराज यांच्याविषयी माहिती देतांना सनातनचे साधक श्री. अमोल हंबर्डे
रायपूर, छत्तीसगड येथील पूज्य शाधनी दरबार तीर्थचे सेवाधारी श्री. अशोककुमार कुकरेजा, श्री. संतोष कुकरेजा, प.पू. (डॉ.) युधिष्ठिरलालजी महाराज आणि नागपूर, महाराष्ट्र येथील पूज्य शाधनी दरबार तीर्थचे सेवाधारी डॉ. पुरुषोत्तम बत्रा यांना ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांविषयी माहिती देतांना एस्.एस्.आर्.एफ्.चे साधक श्री. ओजस्वी सेंगर


Multi Language |Offline reading | PDF