काश्मीरमध्ये ईदच्या नमाजानंतर आतंकवादी झाकीर मुसा आणि मसूद अझहर यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी !

सुरक्षादलांवर दगडफेक

  • धर्मांधांकडून सैन्यावर होणारी आक्रमणे रोखू न शकणारे भाजप सरकार धर्मांधांकडून हिंदूंवर होणारी आक्रमणे कधी रोखू शकेल का ?
  • हिंदूंना ऊठसूठ ‘आतंकवादी’ ठरवणारे पुरो(अधो)गामी आणि कथित विचारवंत हे धर्मांधांच्या या ‘जिहाद’विषयी चकार शब्दही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !
  • आतंकवाद्यांच्या समर्थनार्थ सैन्यावर सातत्याने आक्रमणे होऊ देणारा, आतंकवाद्यांचा उदोउदो होऊ देणारा आणि तरीही त्यांच्यावर काहीही कारवाई न करणारा जगातील एकमेव देश भारत !

श्रीनगर – येथील जामा मशिदीजवळ ईदच्या नमाजानंतर आतंकवादी संघटनांच्या समर्थकांनी चकमकीत मारला गेलेला आतंकवादी झाकीर मुसा आणि जैश-ए-महंमद या आतंकवादी संघटनेचा प्रमुख मसूद अझहर या दोघांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली, तसेच त्यांची छायाचित्रे असलेले फलकही झळकवले. यानंतर एका टोळक्याने सुरक्षादलांवर दगडफेक केली. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेनंतर परिसरातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

धर्मांधांनी झळकवलेले फलक !

या वेळी धर्मांधांनी ‘कश्मीर बनेगा पाकिस्तान’, ‘मुसा आर्मी’, ‘इस्लामिक स्टेट ऑफ जम्मू-कश्मीर’ असे लिखाण असलेले फलक झळकवले.


Multi Language |Offline reading | PDF