(म्हणे) ‘सत्ताधार्‍यांनी धार्मिक उन्माद वाढवण्याचे काम केले !’ – शरद पवार

  • देशभर धर्मांधांच्या आक्रमणात हिंदू हकनाक मरत आहेत, तेव्हा पवार यांना तो धार्मिक उन्माद वाटत नाही, हे लक्षात घ्या !
  • ‘भगव्या आतंकवादा’ची धादांत खोटी संकल्पना निर्माण करून सातत्याने हिंदुद्वेष पसरवणारे शरद पवार यांनी असे विधान करणे हास्यास्पद होय. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा सपाटून पराभव झाला, तरीही पवार यांचा हिंदुद्वेषाचा कंड काही शमत नाही, असेच यावरून म्हणावे लागेल !

मुंबई – लोकांच्या जगण्या-मरण्याच्या खर्‍या प्रश्‍नांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी सत्ताधार्‍यांनी धार्मिक उन्माद वाढवण्याचे काम लोकसभा निवडणुकीत केले. त्यामुळे लोकसभा निवडणुकीचा निकाल काय लागला, हे प्रथम डोक्यातून काढून टाका. (सत्य कटू असले, तरी ते स्वीकारावे लागते, हे पवार यांना लक्षात येत नाही का ? – संपादक) आपल्याला विधानसभा निवडणुकांना पूर्ण ताकदीने सामोरे जायचे आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या पदाधिकार्‍यांच्या बैठकीत सांगितले.

‘महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीत ही मंडळी धार्मिक उन्माद वाढवण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा धार्मिक उन्माद आवरायचा असेल, तर धर्मनिरपेक्ष विचारसरणीच्या लोकांनी आपापसातील मतभेद दूर करून एकत्र आले पाहिजे’, असे पवार या वेळी म्हणाले.


Multi Language |Offline reading | PDF