व्यावसायिक सी.सी. थंपी यांनी चौकशीच्या वेळी घेतले सोनिया गांधी यांचे नाव !

रॉबर्ट वाड्रा यांच्या बेहिशोबी मालमत्तेचे प्रकरण

  • असे नेते असलेला भ्रष्ट पक्ष देशावर ६ दशकांहून अधिक काळ राज्य करतो, ही लोकशाहीची निरर्थकताच ! अशांवर भाजप कारवाई करण्याचे धाडस दाखवील का ?
  • बेहिशोबी मालमत्तेच्या प्रकरणी कशा प्रकारे भ्रष्टाचार झाला, याची माहिती समोर येते; मात्र भ्रष्टाचार करणार्‍यांवर काही कारवाई होत नाही, हेही तितकेच खरे ! भ्रष्टाचार करणारे अजूनही मोकाट फिरत आहेत, हे संतापजनक होय !
रॉबर्ट वाड्रा

नवी देहली – बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) रॉबर्ट वाड्रा (काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांचे पती) यांचे जवळचे व्यावसायिक मित्र सी.सी. थंपी यांची चौकशी केली. या चौकशीत थंपी यांनी ‘काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या खासगी सचिवाने माझी वाड्रा यांच्याशी ओळख करून दिली’, अशी माहिती दिली. रॉबर्ट वाड्रा यांनी दुबई आणि लंडन येथे बेहिशोबी मालमत्ता खरेदी केली असून ती खरेदी करण्यासाठी सी.सी. थंपी यांनी वाड्रा यांना साहाय्य केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

सी.सी. थंपी

या प्रकरणी ‘ईडी’कडून प्रथम वाड्रा यांची आणि नंतर थंपी यांची चौकशी करण्यात आली. या दोघांच्याही जबाबात विसंगती आढळली. ‘यावरून अन्वेषण यंत्रणांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालू असल्याचे सांगत ‘ईडी’ने वाड्रा यांना कह्यात देण्याची मागणी केली.


Multi Language |Offline reading | PDF