तेजपूर, आसाम येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. राणू बोरा यांचे केलेले सूक्ष्म परीक्षण

श्रीमती राणू बोरा

१. ‘सौ. बोरा बोलतांना हलके जाणवत होते. ‘त्या कर्मयोगी आणि भक्तीयोगी दोन्ही असून व्यष्टीकडून समष्टी साधनेकडे जात असल्याने त्यांच्या वाणीतून गोडवा जाणवत आहे’, असे लक्षात आले.

२. सौ. बोरा यांचे वय ७१ वर्षे असूनही त्या तुलनेत तरुण दिसत होत्या. ‘कर्मयोगाच्या साधनेमुळे त्यांच्यात प्राणशक्तीचे प्रमाण अधिक असल्याने त्या तरुण दिसतात’, असे लक्षात आले.

३. सौ. बोरा अत्याचाराचे विषय मांडतांनाही भावनिक स्तरावर नसून स्थिर होत्या. यातून ‘आंतरिक साधनेमुळे त्यांचे मन सात्त्विक आणि स्थिर झाले आहे’, असे लक्षात आले.

४. सौ. बोरा यांना चांगले हिंदी येत नसतांनाही त्यांचे बोलणे सुस्पष्ट, आकलनीय आणि सूत्रबद्ध होते. समितीच्या वक्त्यांशिवाय एवढे सूत्रबद्धपणे विषय मांडणार्‍या त्या एकमेव आढळल्या. ‘विषय मांडण्याची त्यांची तळमळ आणि भाव यांमुळे ईश्‍वर त्यांना परिपूर्णपणे विषय मांडण्यास साहाय्य करत आहे’, असे लक्षात आले.

५. सौ. बोरा यांच्या बोलण्यात नेतृत्त्व आणि भाव दोन्ही जाणवत होता. त्यांची ‘आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाली आहे’, असे जाणवले.’ (बरोबर आहे. – संकलक)

– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान)(३१.५.२०१९)


Multi Language |Offline reading | PDF