दैवी बालक चि. वृषांक शंकर जैन आणि धर्मनिष्ठ संत पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन यांच्या आध्यात्मिक प्रगतीविषयी मिळालेल्या पूर्वसूचना !

१. तीन मासांपूर्वी रामनाथी आश्रमात आलेल्या चि. वृषांकला पाहून ‘हा दैवी बालक असून याची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के असेल’, असा विचार मनात येणे

श्री. भूषण कुलकर्णी

‘अनुमाने ३ मासांपूर्वी अधिवक्ता विष्णु शंकर जैन हे त्यांची पत्नी आणि मुलगा चि. वृषांक यांच्यासह रामनाथी आश्रमात काही घंट्यांसाठी आले होते. त्या वेळी चि. वृषांकचे प्रेमळ आणि लाघवी बोलणे, तसेच साधकांशी बोलतांना त्याच्याकडून व्यक्त होेणारा आदरभाव पाहून ‘चि. वृषांक हा दैवी बालक असून त्याची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के असेल’, असा विचार माझ्या मनात आला.

२. ‘अधिवक्ता हरि शंकर जैन आणि अधिवक्ता रवींद्र घोष यांना ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’त संत घोषित करतील’, असे जाणवणे

२२.५.२०१९ या दिवशी मी एका साधिकेला म्हटले, ‘‘आता २७ मेपासून चालू होणार्‍या ‘अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’त काही जणांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, तर काही जण ‘संत’ म्हणून घोषित होतील.’’ हे बोलणे चालू असतांना माझ्या मनात ‘अधिवक्ता हरि शंकर जैन आणि अधिवक्ता रवींद्र घोष हे दोघे ‘संत’ म्हणून घोषित होतील’, असा विचार आला.’ (प्रत्यक्षातही अधिवेशनात ३० मे या दिवशी अधिवक्ता हरि शंकर जैन यांना आणि अधिवक्ता रवींद्र घोष यांना ३१ मे या दिवशी ‘संत’ म्हणून घोषित करण्यात आले. – संकलक)
– श्री. भूषण कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.५.२०१९)

‘राष्ट्रीय अधिवक्ता अधिवेशना’त अधिवक्ता हरि शंकर जैन यांचे मिटलेले डोळे पाहून ‘त्यांचे ध्यान लागत असून ते प्रभु श्रीरामाच्या अनुसंधानात आहेत’, असे वाटणे

‘२७ आणि २८ मे या दोन्ही दिवशी ‘राष्ट्रीय अधिवक्ता अधिवेशना’त अधिवक्ता हरि शंकर जैन उपस्थित होते. या दोन दिवसांच्या कालावधीत अधिवेशनात विविध विषयांची उद्बोधन सत्रे चालू होती. त्या वेळी त्यांंचे डोळे आपोआप बंद होऊन ‘त्यांना ध्यान लागत आहे आणि ते प्रभु श्रीरामाच्या अनुसंधानात आहेत’, असे मला जाणवले.’ – श्री. भूषण कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.५.२०१९)
(प्रत्यक्षातही त्यांनी ध्यान लागत असल्याचे सांगितले. – संकलक)


Multi Language |Offline reading | PDF