पुणे येथील श्रीमती शकुंतला पिंपळेआजी (वय ८२ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

श्रीमती शकुंतला पिंपळेआजी यांचा सत्कार करतांना सौ. मनीषा पाठक (डावीकडे)

पुणे, ४ जून (वार्ता.) – संसारिक कर्तव्य नेटाने पार पाडणार्‍या आणि ‘देवच सर्वकाही करवून घेत आहे’, या श्रद्धेने साधना करून आनंदी रहाणार्‍या येथील श्रीमती शकुंतला पिंपळेआजी (वय ८२ वर्षे) ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाल्या आहेत’, हे आनंदवृत्त ६५  टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. मनीषा पाठक यांनी २ जून या दिवशी एका अनौपचारिक सत्संगात सांगितले. या आनंदसोहळ्याच्या वेळी आजींचा मुलगा श्री. प्रदीप पिंपळे आणि सून सौ. सुधा पिंपळे, तसेच पुणे येथील साधक उपस्थित होते. या वेळी सौ. मनीषा पाठक यांनी प्रभु श्रीरामाचे चित्र भेट म्हणून देऊन आजींचा सत्कार केला.

संसारातील कर्तव्ये साधना म्हणून केल्याचे फळ पिंपळेआजींना मिळाले ! – सौ. मनीषा पाठक

‘आजींना प्रत्येक गोष्ट देव करून घेणार आहे’, यावर विश्‍वास आणि श्रद्धा आहे. त्यांनी आयुष्यभर संसारातील कर्तव्ये ही सेवा आणि साधना म्हणून केली. त्याचेच हे फळ त्यांना मिळाले आहे’, असे सौ. मनीषा पाठक यांनी सांगितले.

‘साधक घरी आलेले पाहून चांगले वाटले’, असे आजींनी या वेळी सांगितले.


Multi Language |Offline reading | PDF