पुणे येथे ‘गार्गी फाऊंडेशन’कडून निवेदन

उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे (डावीकडे) यांना निवेदन देतांना ‘गार्गी फाऊंडेशन’चे कार्यकर्ते

पुणे – ‘गार्गी फाऊंडेशन’च्या कार्यकर्त्यांनी अधिवक्ता संजीव पुनाळेकर आणि माहिती अधिकार कार्यकर्ते श्री. विक्रम भावे यांची अन्याय्य अटक रहित करावी अन् त्यांना मुक्त करावे’ या मागणीचे निवेदन देण्यात आले. पुण्याच्या निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हा दंडाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी हे निवेदन स्वीकारले. या वेळी ‘गार्गी फाऊंडेशन’चे अध्यक्ष श्री. विजय गावडे, कार्यकर्ते सर्वश्री गुरु कोळी, आमोद विटकर, योगीराज मांडले, युवराज काळे आणि विशाल पवार हे उपस्थित होते.


Multi Language |Offline reading | PDF