धर्मशास्त्रांचा अभ्यास आणि विलक्षण नम्रता असलेले डॉ. शिवनारायण सेन !


‘शास्त्र धर्म प्रचारसभे’चे महासचिव डॉ. शिवनारायण सेन हे शासनात मोठ्या पदावर असतांना हिंदु धर्मातील आचारधर्माचे पालन सर्वत्र होईल, याची काळजी घेत होते. कलियुगात सनातन धर्माच्या परंपरेनुसार आचारधर्म पाळणे किती कठीण आहे, याची थोडी कल्पना आपल्या सर्वांना आहे. धर्मशास्त्रांचा अभ्यास असूनही त्यांच्यामध्ये विलक्षण नम्रता आहे. त्यांच्या मुखमंडलावर सतत भावावस्था असते. ते शब्दांच्या माध्यमातून राष्ट्र आणि धर्म यांच्याविषयी जागृती करता करता आता ते शब्दांच्या पलीकडे, म्हणजे अध्यात्माच्या उच्च अवस्थेला गेले आहेत. त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांकडे पाहून आनंदाची अनुभूती येते. ते भाषण करतांना, विशेषतः नास्तिकांच्या विरुद्ध बोलतांना त्यांच्यातील क्षात्रतेजाचे दर्शन घडते. ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज असलेले असे डॉ. शिवनारायण सेन यांच्यामध्ये गुरुभक्ती आणि हरिभक्ती यांचाही अपूर्व संगम आहे. ते खर्‍या अर्थाने भगवद्भक्त आहेत. अधिवेशनात त्यांच्या भाषणामध्ये सर्वांना चैतन्याची अनुभूती आली, हे त्यांचे संतत्व सिद्ध करते. डॉ. शिवनारायण सेन यांचा आध्यात्मिक स्तर ७१ टक्के झाला असून ते संतपदी विराजमान झाले आहेत, हे सांगतांना मला विशेष आनंद होत आहे. ‘त्यांची पुढील आध्यात्मिक प्रगती जलद गतीने होवो’, अशी मी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना करतो !’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले


Multi Language |Offline reading | PDF