आम्हाला भगवंताचे दास व्हायचे आहे ! – पू. (डॉ.) शिवनारायण सेन

पू. (डॉ.) शिवनारायण सेन यांनी व्यक्त केलेले मनोगत !

‘‘मी या सन्मानासाठी पात्र नाही. ईश्‍वर जेव्हा त्याचा झेंडा कोणाच्या हातामध्ये देतो, तेव्हा तो सदर झेंडा फडकावण्याची शक्तीही देतो. ‘ज्यांनी मला संत बनवले, त्यांनीच माझ्याकडून पुढील कार्यही करून घ्यावे’, अशी मी प्रार्थना करतो. ‘विज्ञानाच्या पुढेही ईश्‍वराची शक्ती आहे’, हे धर्माचे कार्य करणार्‍यांनी जाणणे आवश्यक आहे. जीवनात सत्य सर्वांत मोठी शक्ती आहे. सत्य हेच शास्त्र आहे आणि शास्त्र हाच धर्म आहे. सत्य हेच शिव आहे आणि सत्याचा आश्रय घेतला, तर भगवंताची कृपा निश्‍चितपणे होते. आपल्याला भगवंताचे दास व्हायचे आहे. त्याची भक्ती करायची आहे. आज हिंदु धर्मावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. त्यामुळे हिंदूसंघटनासाठी आपण कटीबद्ध झाले पाहिजे. ‘शास्त्र धर्म प्रचार सभे’च्या कार्याला थोर संतांचे आशीर्वाद लाभले आहेत.’’


Multi Language |Offline reading | PDF