इस्लामाबाद येथे भारतीय उच्चायुक्तालयाने आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीतील पाहुण्यांना पाकिस्तानने धमकावून परत पाठवले !

  • आणखी किती वेळा अवमानित झाल्यावर भाजप सरकार पाकच्या विरोधात ठोस पाऊल उचलणार ?
  • पाकचा हा उद्दामपणा थांबवण्यासाठी भाजप सरकारने १-२ सर्जिकल स्ट्राईक करून न थांबता त्याच्या लक्षात राहील, असा धडा शिकवणे आवश्यक !
  • भारतातील पाकच्या उच्चालयाकडून काश्मीरमधील फुटीरतावाद्यांसमवेत बैठक आयोजित केली जाते आणि भारत त्याकडे निष्क्रीयपणे पहात रहातो ! अशा भारताला पाककडून अशा प्रकारची वागणूक मिळत असेल, तर आश्‍चर्य ते काय !
“Stopping diplomats and officials of the High Commission of India in Pakistan from discharging their diplomatic functions is entirely counter-productive,” India said after Pakistan officials stopped 300 visitors from entering the Indian High Commission in Islamabad for an Iftar party.

इस्लामाबाद – येथे १ जून या दिवशी भारतीय उच्चायुक्तालयाने इफ्तार पार्टी (मेजवानी) आयोजित केली होती; मात्र या मेजवानीसाठी आलेल्या पाहुण्यांसमवेत पाकिस्तानी अधिकार्‍यांनी गैरवर्तणूक करून पाहुण्यांना धमकावल्याची घटना समोर आली आहे. पाकिस्तानी अधिकार्‍यांनी पाहुण्यांना कार्यक्रमस्थळावरूनही बळजबरीने परत पाठवले. त्यांच्या गाड्याही चौकशीच्या नावाखाली कह्यात घेतल्या. या घटनेमुळे भारत आणि पाक यांच्यात पुन्हा तणाव निर्माण झाला आहे.

१. पाकिस्तानी अधिकार्‍यांनी इफ्तार पार्टी आयोजित करण्यात आलेल्या होटेल ‘सेरेना’च्या बाहेर घेराव घातला होता.

या संदर्भात भारताचे पाकमधील उच्चायुक्त अजय बिसारिया म्हणाले, ‘‘इफ्तार पार्टीतून बळजोरीने परत पाठवण्यात आलेल्या आमच्या सर्व पाहुण्यांची आम्ही क्षमा मागत आहोत. अशा प्रकारे धमकावण्याचा प्रकार निराशाजनक आहे. त्यांनी राजकीय शिष्टाचार, तसेच सभ्य व्यवहाराचे उल्लंघन केलेच आणि दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधही बिघडवले आहेत.’’

२. विविध प्रसारमाध्यमांतील वृत्तानुसार पाकिस्तानी अधिकार्‍यांनी भारतीय पाहुण्यांना निरनिराळ्या क्रमांकांवरून दूरभाष करून, ‘मेजवानीत सहभागी झाल्यास गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल’, अशी धमकी दिली होती. अवमान झाल्यामुळे इस्लामाबादेतील भारतीय उच्चायुक्तालयाच्या इफ्तारच्या मेजवानीमध्ये खूप अल्प जण पोचले. या मेजवानीसाठी पाकचे पंतप्रधान इम्रान खान, राष्ट्रपती आरिफ अल्वी आणि अन्य मान्यवर यांना बोलावण्यात आले होते.

३. या आठवड्याच्या प्रारंभीच देहलीमध्ये पाकिस्तान उच्चायुक्तालयानेही इफ्तार मेजवानीचे आयोजन केले होते. त्यामध्ये अनेक लेखक, कलाकार, पाकिस्तानी विद्यार्थी आणि इतर अनेकांनी सहभाग घेतला होता. (भारत गांधीगिरी करत असल्याने पाकची ही इफ्तार पार्टी सुरळीत पार पडली, यात आश्‍चर्य ते काय ? – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF