(म्हणे) ‘जमावाकडून मुसलमानांच्या कत्तली केल्या जात आहेत !’ – समाजवादी पक्षाचे खासदार डॉ. शफीकुर रहमान बर्क यांचा कांगावा

  • मुसलमानांना नव्हे, तर हिंदूंना ठार केले जात आहे, ही वस्तूस्थिती आहे, हे बर्क का सांगत नाहीत ?
  • काश्मीरमध्ये साडेचार लाख हिंदूंना मशिदींमधून धमक्या देऊन पळवून लावण्यात आले, तर सहस्रो हिंदूंच्या हत्या करण्यात आल्या, तसेच अनेक हिंदु महिलांवर बलात्कार करण्यात आले. अजूनही हिंदू काश्मीरध्ये रहाण्यासाठी जाऊ शकत नाहीत, याविषयी बर्क का बोलत नाहीत ?
  • मुसलमानांच्या वस्तीत एखाद्या गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांना तेथे जमावाकडून मारहाण करून पळवून लावले जाते. याविषयी बर्क का बोलत नाहीत ?
  • देवास (मध्यप्रदेश) येथे मशिदींतून दगडफेक करण्यात आल्याने एक हिंदु तरुण ठार झाला, अनेक हिंदू घायाळ झाले. तसेच धर्मांधांनी पोलीस ठाण्यात घुसून हिंदूंना मारहाण केली. हा हिंसाचार बर्क यांना दिसत नाही का ?

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – देशात मुसलमान सुरक्षित नाहीत. (मुसलमान नाही, तर हिंदू सुरक्षित नाहीत, हीच वस्तूस्थिती आहे ! – संपादक) धार्मिक दंगली घडवून जमावाद्वारे मुसलमानांच्या कत्तली केल्या जात आहेत. मुसलमान समाजाला देशात कुठल्याच प्रकारचे वाद किंवा हिंसा नको आहे. (चोरांच्या उलट्या बोंबा ! – संपादक) तरी आम्हाला पाकिस्तानमध्ये जाण्यास सांगतात. (ओवैसी यांच्यासारखे नेते देशामध्ये मुसलमानांची भागीदारी मागत आहेत; मात्र ही भागीदारी पाकिस्तान देऊन पूर्ण केलेली असतांना अशी मागणी कशी केली जाते ? – संपादक) आमचा जन्म या देशातच झाला, आम्ही येथेच राहू आणि राजकारण करू. आमच्या देशावर आमचे प्रेम आहे, असे विधान समाजवादी पक्षाचे खासदार डॉ. शफीकुर रहमान बर्क यांनी केले आहे. (देशावर प्रेम आहे, तर ते कधी दाखवले आहे ? देशाच्या एकातरी राष्ट्रीय समस्येवर आवाज उठवण्यात येतो का ? काश्मीरमधून हिंदूंना पळवून लावण्यात आले, त्याविषयी कधी बोलले जाते का ? बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमान यांच्या घुसखोरीचा विरोध करण्याऐवजी त्यांना भारताचे नागरिकत्व देण्याची मागणी का केली जाते ? – संपादक) राज्यातील चंदौसीमध्ये आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीमध्ये ते बोलत होते.

शफीकुर बर्क पुढे म्हणाले की, भाजपची देशावर मक्तेदारी नाही. संघाने देशासाठी काहीच केले नाही. स्वातंत्र्यलढ्यात अनेक मुसलमानांनी हौतात्म्य पत्करले. (बर्क यांना त्यांची नावे आणि त्यांचे कर्तृत्व ठाऊक असल्यास ते लोकांना सांगावे म्हणजे लोकांच्या ज्ञानातही भर पडेल ! – संपादक)

त्यानंतरही मुसलमानांना पाकिस्तानात पाठवण्याचे वक्तव्य केले जाते. ‘आम्हाला जगण्याचा हक्क कधी मिळणार?’, हा प्रश्‍न आम्ही संसदेत विचारू. (‘बहुसंख्येने मुसलमान असलेल्या ठिकाणी अल्पसंख्य हिंदूंना जगू देण्याचा अधिकार कधी मिळणार?’, याचे उत्तर बर्क देणार आहेत का ? – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF