प्रयागराज येथील कुंभमेळ्यात लावलेल्या सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट दिल्यावर संत स्वामी रास रसिकराज महाराज यांनी काढलेले कौतुकोद्गार !

‘प्रयागराज येथील कुंभमेळ्यात लावलेल्या ग्रंथप्रदर्शनाला अयोध्येतील एक संत स्वामी रास रसिकराज महाराज यांनी भेट दिली. त्यांनी ग्रंथप्रदर्शन पाहून सांगितले,

१. ‘‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ग्रंथांमधून सनातन धर्माविषयी जे लिहिले आहे, त्याची आज समाजाला नितांत आवश्यकता आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सनातन धर्माचा गाढा अभ्यास आहे.

२. सर्व साधकांच्या तोंडवळ्यावरील आनंद आणि नम्रता पाहून ‘त्यांच्या गुरूंंची शिकवण किती परिपूर्ण आहे !’, हे लक्षात येते.

३. मला ग्रंथप्रदर्शनस्थळी भारद्वाज ऋषि आणि याज्ञवल्क्य ऋषि यांचे अस्तित्व जाणवले.’’ (‘भारद्वाज ऋषींनी ‘प्रयागराज’ हे शहर वसवले आहे आणि याज्ञवल्क्य ऋषि ‘शतपथ ब्राह्मण’ या ग्रंथाचे रचनाकार आहेत.’ – संकलक)

– कु. कृतिका खत्री, देहली (२६.२.२०१९)


Multi Language |Offline reading | PDF