बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांना वाचा फोडण्यासाठी शेवटपर्यंत कार्यरत राहीन ! – अधिवक्ता रवींद्र घोष, अध्यक्ष, ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’

हिंदु जनजागृती समिती आयोजित गोवा येथील अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाचा दुसरा दिवस

भगवंताच्या आशीर्वादामुळेच हिंदूंच्या रक्षणासाठी कार्यरत रहाणे शक्य !

‘भगवंताच्या आशीर्वादामुळेच आम्ही बांगलादेशामध्ये हिंदूंच्या रक्षणासाठी कार्य करू शकत आहोत. तेथील हिंदूंसाठी कार्यरत रहाणे, हीच माझी साधना आहे’, असा भाव अधिवक्ता रवींद्र घोष यांनी व्यक्त केला. ‘बांगलादेशातील हिंदूंवर होणार्‍या भयानक अत्याचारांच्या घटना रोखण्यासाठीची उपाययोजना काय ?’, असा प्रश्‍न उपस्थित करून ‘बांगलादेशमधील हिंदूंच्या रक्षणासाठी ‘संतांचे आशीर्वाद आणि सदिच्छा’, हाच उपाय आहे’, असे अधिवक्ता रवींद्र घोष यांनी सांगितले. हिंदूंच्या रक्षणासाठी सरकार, पोलीस आणि प्रशासन दरबारी निरंतर प्रयत्न करूनही आतापर्यंत कोणताच सकारात्मक प्रतिसाद अधिवक्ता घोष यांना मिळाला नाही. या प्रयत्नांच्या अंती ‘बांगलादेशातील हिंदूंसाठी भगवंतच आधार आहे’, असे अधिवक्ता घोष यांना मनोमन वाटत असल्याचे त्यांच्या भाषणातून प्रतित होत होते. स्वतःचा जीव धोक्यात घालून, तसेच अनेक आक्रमणे झेलून हिंदूंच्या रक्षणासाठी प्रयत्नरत असलेले अधिवक्ता घोष यांना सर्वसामान्य हिंदूंप्रती असलेली आत्मीयता आणि तळमळही उपस्थित हिंदुत्वनिष्ठांना प्रेरणादायी ठरली.

विद्याधिराज सभागृह (रामनाथ देवस्थान), रामनाथी (गोवा), ३० मे (वार्ता.) – बांगलादेशात हिंदूंची स्थिती दयनीय असून बलात्कार, हिंदूंची घरे जाळणे-लुटालूट, मंदिरांची तोडफोड या घटना तेथे आता नित्याच्या झाल्या आहेत. बांगलादेशाच्या निर्मितीच्या वेळी तेथे १८ ते २० टक्के असलेली हिंदूंची लोकसंख्या जेमतेम ८ टक्के शेष  आहे. बांगलादेश सरकार हिंदूंच्या रक्षणाविषयी निष्क्रीय आहे. भारत सरकारनेही आता उदासीनता सोडून आम्हा बांगलादेशी हिंदूंच्या सुरक्षेकडे लक्ष दिले पाहिजे. बांगलादेशामध्ये हिंदूंसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी मी शेवटपर्यंत लढत राहीन, असा ठाम निश्‍चय बांगलादेश येथील ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे अध्यक्ष अधिवक्ता रवींद्र घोष यांनी व्यक्त केला. ते ३० मे या दिवशी श्री रामनाथ देवस्थानच्या श्री विद्याधिराज सभागृहात ‘अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या दुसर्‍या दिवसाच्या प्रथम सत्रात बोलत होते. या वेळी व्यासपिठावर ‘वर्ल्ड हिंदु फेडरेशन’चे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष श्री. अजय सिंह, हिंदु जनजागृती समितीचे प्रयाग (उत्तरप्रदेश) समन्वयक श्री. गुरुराज प्रभु आणि समितीचे कर्नाटक राज्य समन्वयक श्री. गुरुप्रसाद गौडा हे उपस्थित होते. ‘बांगलादेशाच्या राज्यघटनेतच ‘इस्लामी राष्ट्र’ असा शब्द अंतर्भूत करण्यात आला आहे. बांगलादेशामध्ये हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांच्या विरोधात भारत सरकारलाही निवेदन देण्यात आलेे; पण काही निष्पन्न झाले नाही.

अधिवेशनाच्या प्रारंभी संतांनी अधिवेशनासाठी दिलेल्या संदेशाचे वाचन करण्यात आलेे. सिंधुदुर्ग येथील प.पू. दास महाराज यांनी दिलेल्या संदेशाचे वाचन श्री. गुरुप्रसाद गौडा यांनी, तर रत्नागिरी येथील प.पू. उल्हासगिरी महाराज यांनी दिलेल्या आशीर्वादपर संदेशाचे वाचन हिंदु जनजागृती समितीचे रत्नागिरी समन्वयक श्री. विनोद गादीकर यांनी केले. अधिवेशनाला उपस्थित असलेले पू. चंद्रकांत महाराज शुक्ल यांचा सन्मान हिंदु जनजागृती समितीचे गुजरात राज्य समन्वयक श्री. संतोष आळशी यांनी केला.

क्षणचित्रे

१. अधिवक्ता रवींद्र घोष यांनी त्यांच्या मार्गदर्शनाच्या वेळी पडद्यावर (स्क्रीनवर) बांगलादेशामध्ये हिंदूंवर झालेल्या अत्याचारांच्या काही घटनांची दृश्ये दाखवली. सामूहिक बलात्कार झालेल्या महिलांचे अनुभव, हिंदूंच्या घरांवर धर्मांधांकडून केली जाणारी आक्रमणे, मंदिरांची केली जाणारी जाळपोळ यांवर प्रकाश टाकणारी ही ध्वनीचित्रफीत पाहून उपस्थित सर्वच हिंदुत्वनिष्ठांच्या मनात या अन्यायाविषयी चीड निर्माण झाली.

२. ‘आम्ही बांगलादेशामधील हिंदूंच्या पाठीशी आहोत. तेथील हिंदूंच्या न्यायासाठी प्रयत्नरत राहू’, असे आश्‍वासन सूत्रसंचालक श्री. कार्तिक साळुंखे यांनी अधिवेशनात सहभागी झालेल्या हिंदुत्वनिष्ठांच्या वतीने दिले.

३. ‘बांगलादेश की हिंदूंओ पर हो रहा अत्याचार, नही सहेगा हिंदुस्थान !’ अशा घोषणा देऊन बांगलादेशी हिंदूंना समर्थन देण्यात आले.

भगवंताच्या आशीर्वादामुळेच हिंदूंच्या रक्षणासाठी कार्यरत रहाणे शक्य ! – अधिवक्ता रवींद्र घोष

‘भगवंताच्या आशीर्वादामुळेच आम्ही बांगलादेशामध्ये हिंदूंच्या रक्षणासाठी कार्य करू शकत आहोत. तेथील हिंदूंसाठी कार्यरत रहाणे, हीच माझी साधना आहे’, असा भाव अधिवक्ता रवींद्र घोष यांनी व्यक्त केला.

‘बांगलादेशातील हिंदूंवर होणार्‍या भयानक अत्याचारांच्या घटना रोखण्यासाठीची उपाययोजना काय ?’ असा प्रश्‍न उपस्थित करून ‘बांगलादेशमधील हिंदूंच्या रक्षणासाठी ‘संतांचे आशीर्वाद आणि सदिच्छा’ हाच उपाय आहे’, असे अधिवक्ता रवींद्र घोष यांनी सांगितले. हिंदूंच्या रक्षणासाठी सरकार, पोलीस-प्रशासन यांच्याकडे निरंतर प्रयत्न करूनही आतापर्यंत कोणताच सकारात्मक प्रतिसाद अधिवक्ता घोष यांना मिळाला नाही. या प्रयत्नांच्या अंती ‘बांगलादेशातील हिंदूंसाठी भगवंतच आधार आहे’, असे अधिवक्ता घोष यांना मनोमन वाटत असल्याचे त्यांच्या भाषणातून प्रतित होत होते. स्वतःचा जीव धोक्यात घालून, अनेक आक्रमणे झेलून हिंदूंच्या रक्षणासाठी प्रयत्नरत असलेले अधिवक्ता घोष यांना सर्वसामान्य हिंदूंप्रती असलेली आत्मियता आणि तळमळही हिंदुत्वनिष्ठांना प्रेरणादायी ठरली.

हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी संघटित होऊन शक्तीप्रदर्शन करणे आवश्यक ! – अजय सिंह, आंतरराष्ट्रीय अध्यक्ष, वर्ल्ड हिंदु फेडरेशन

‘सर्व धर्मांत हिंदु धर्म उत्तम धर्म आहे. तो सर्व प्राणीमात्रांच्या हिताचा विचार करतो. हिंदु धर्माचे रक्षण आणि प्रचार केला पाहिजे. हिंदूंची संख्या जगभरात न्यून होत चालली आहे. जगभरात हिंदूंसाठी कार्य करणार्‍या अनेक संघटना आहेत. त्यांनी संघटित होऊन शक्तीप्रदर्शन करायला हवे.’

या वेळी श्री. अजय सिंह यांनी ‘वर्ल्ड हिंदु फेडरेशन’ची स्थापना आणि तिचे देश-विदेशातील कार्य यांचीही माहिती दिली.

हिंदु जनजागृती समिती हिंदूंच्या आत्म्याला उज्ज्वल करत आहे ! – अजय सिंह

हिंदु जनजागृती समिती हिंदूंच्या आत्म्याला उज्ज्वल करत आहे. हिंदूंना संस्कार शिकवण्याचे काम करत आहे.

भारतासह जगभरात हिंदु राष्ट्राची स्थापना होणार असल्याविषयी मिळाला दैवी संकेत !

‘आंतरराष्ट्रीय स्तरावर हिंदूंना संघटित करण्यासाठी केलेले प्रयत्न’ याविषयी उद्बोधन चालू असतांना सभागृहाच्या छतावरून काही वानर उड्या मारत गेले. उद्बोधनामध्ये श्री. अजय सिंह नेपाळविषयी बोलत होते. नेपाळ ही सीतेची जन्मभूमी आहे. हनुमंतही सीमा पार करून लंकेत गेले आणि रामराज्याच्या स्थापनेच्या कार्यात सहभाग घेतला. यावरून ‘केवळ भारतात नाही, भारताची सीमा पार करून संपूर्ण विश्‍वभरात हिंदु राष्ट्राची स्थापना होणार आहे’, असा दैवी संकेत हनुमंताने वानरांच्या माध्यमातून दिला.

धर्मनिरपेक्ष लोकशाहीवादी देश झाल्यापासून नेपाळमध्ये भारतविरोधी शक्तींच्या कारवायांमध्ये वाढ ! – गुरुराज प्रभु

एक षड्यंत्र आखून राजेशाही असलेल्या नेपाळमध्ये लोकशाही थोपवली गेली. त्या वेळी तेथील जनतेने संघटितपणे विरोध केला नाही. नेपाळ गिळकृंत करण्यासाठी चीन प्रयत्नशील आहे. तेथील हिंदूंचे आणि बौद्धांचे धर्मांतर करण्यासाठी शेकडो चर्च कार्यरत आहेत. नेपाळमध्ये जेव्हा लोकशाही आणली गेली, तेव्हा राज्यघटनेमध्ये नेपाळला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्यासाठी जनतेने आवाज उठवला; पण राज्यघटनेमध्ये ऐनवेळी ‘धर्मनिरपेक्ष’ हा शब्द घुसडून तेथील शासनकर्त्यांनी नेपाळी जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला. नेपाळमध्ये पूर्वी राजेशाही असतांना सनातन धर्मरक्षणासाठी कार्य केले जात होते. नेपाळ धर्मनिरपेक्ष लोकशाहीवादी देश झाल्यापासून तेथील भारतविरोधी शक्तींच्या कारवाया वाढल्या आहेत.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती या संघटनांविषयी नेपाळमध्ये आदर

‘नेपाळमध्ये सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांविषयी आदर आहे. याच संघटना हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी निःस्वार्थपणे कार्य करत आहेत, अशी भावना नेपाळवासियांमध्ये आहेे’, असे श्री. गुरुराज प्रभु यांनी सांगितले.

‘धर्मपरिवर्तनाची समस्या आणि उपाय’ या विषयावरील उद्बोधनसत्र

अध्यात्माच्या आधारेच हिंदु राष्ट्र निर्माण होऊन रामराज्याची स्थापना होईल ! – पू. महंत श्रीरामज्ञानीदासजी महाराज, महात्यागी सेवा संस्थान, गोंदिया

आज समाज अराजकतेच्या दिशेने चालला आहे. त्यामुळे तरुणांचा उत्साह आणि वृद्धांचा अनुभव यांच्या साहाय्याने समाजामध्ये धर्मजागृती केली पाहिजे. आज आम्ही शिक्षणाद्वारे बौद्धिक प्रगती केली आहे; मात्र मनाने अजूनही कमकुवत आहोत. त्यामुळे आपल्यात भगवद्भक्ती निर्माण करून आध्यात्मिक बळ मिळवणे आवश्यक आहे. अध्यात्माच्या आधारेच हिंदु राष्ट्र निर्माण होऊन रामराज्याची स्थापना होईल, असे प्रतिपादन गोंदिया येथील महात्यागी सेवा संस्थानचे अध्यक्ष पू. महंत श्रीरामज्ञानीदासजी महाराज यांनी केले. ३० मे या दिवशी अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनातील ‘धर्मपरिवर्तनाची समस्या आणि उपाय’ या विषयावरील उद्बोधनसत्रात ते बोलत होते. या सत्रात गुजरात येथील भागवत कथावाचक पू. चंद्रकांत महाराज शुक्ल, हिंदु जागरण मंचाचे दक्षिण आसाम प्रांत विधीप्रमुख अधिवक्ता राजीव नाथ आणि देहली येथील अग्नीवीर संघटनेचे श्री. सतीश वैद यांनीही संबोधित केले.

पू. महंत श्रीरामज्ञानीदासजी महाराज पुढे म्हणाले, ‘‘देशातील ऋषिपरंपरा  संकटात आहे. हिंदु धर्म जिवंत ठेवायचा असेल, तर या परंपरा टिकवल्या पाहिजेत. त्यामुळे हिंदु धर्म पुन्हा पुनर्जीवित होईल. त्याकरता गावांमध्ये जाऊन यज्ञ, रामकथा यांच्या माध्यमातून लोकांचे प्रबोधन आणि संघटन केले पाहिजे. राम साक्षात धर्म आहे. रामाच्या पदचिन्हावर चालून रामाचा आदर्श सर्वांमध्ये निर्माण केला पाहिजे.’’

हिंदु धर्माला पुढे घेऊन जाण्याची आवश्यकता आहे !  पू. चंद्रकांत महाराज शुक्ल, भागवत कथावाचक

विदेशातील लोक हिंदु धर्माने प्रभावित होऊन हिंदु धर्म स्वीकारण्यासाठी पुढे येत आहेत; परंतु भारतातील हिंदूंना जागृत करण्यासाठी प्रयत्न करावे लागत आहेत, ही दु:खाची गोष्ट आहे. आज हिंदूच हिंदु धर्माची अवहेलना करत आहेत. आदिवासी क्षेत्रात ख्रिस्त्यांकडून मोठ्या प्रमाणात धर्मांतर करण्यात येत आहे. त्यामुळे हिंदूंनी जागृत होऊन सनातन धर्माला पुढे घेऊन जाण्याची आवश्यकता आहे अन्यथा येणारा काळ हिंदूंसाठी कठीण असेल.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्णच धर्मरक्षणाचे कार्य करत आहे ! – पू. चंद्रकांत महाराज शुक्ल, भागवत कथावाचक

हिंदूंना जागृत करण्याचे कार्य सनातन संस्था करत आहे. ही शेवटची संधी आहे. आता हिंदू जागृत झाले नाहीत, तर त्यांना पुढे जागृत करण्यासाठी कोणी येणार नाही. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे संत अन् कार्यकर्ते यांच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्णच धर्मरक्षणाचे कार्य करत आहे. त्यामुळे धर्माचे रक्षण होईल, याची मला खात्री आहे.

हिंदूंचे होणारे धर्मांतर रोखण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी पुढाकार घ्यावा ! – सतीश वैद, अग्नीवीर संघटना, देहली

अनेक धर्मांध ख्रिस्ती आणि मुसलमान हिंदु नाव धारण करून सोयीसुविधा उपभोगत आहेत. अनुसूचित जातीतील लोक हे धर्मांतराचे ‘सॉफ्ट टार्गेट’ झाले आहेत. औरंगजेबाने धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्यावर या समाजाने मैला वहाणे स्वीकारले; परंतु धर्मांतर स्वीकारले नाही. हिंदूंचे होणारे धर्मांतर रोखण्यासाठी आणि धर्मांतरितांच्या शुद्धीकरणासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी पुढाकार घ्यावा.

वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरून लव्ह जिहाद आणि धर्मांतर रोखणे शक्य ! – अधिवक्ता राजीव नाथ

सिलचर (आसाम) येथे हिंदूंचे होणारे धर्मांतर रोखण्यासाठी कार्य करतांना आलेले अनुभव हिंदु जागरण मंचाचे अधिवक्ता राजीव नाथ यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘ईशान्य भारतात ‘लव्ह जिहाद’च्या अनेक घटना घडत आहेत. अशा प्रकरणांची माहिती मिळाल्यावर आम्ही हिंदु मुलीला भेटून हिंदु धर्म आणि इस्लाम धर्म यांची वास्तविक माहिती करून देतो. त्यानंतर मुलीने मुसलमान होण्यापेक्षा मुलाने हिंदु धर्म स्वीकारावा किंवा ‘स्पेशल मॅरेज अ‍ॅक्ट’च्या अंतर्गत विवाह करावा, जेणेकरून मुसलमानांना ‘तोंडी तलाक’ देता येऊ शकत नाही’, असे पर्याय सुचवतो. त्यातूनही लव्ह जिहादची घटना घडलीच, तर पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न करतो. प्रबोधन केल्यानंतर हिंदु मुलींचे मनपरिवर्तन होऊन लव्ह जिहादच्या घटना रोखण्यात यश येते. ईशान्य भारतात ख्रिस्तीकरणाचीही समस्या मोठी आहे. आमीष दाखवून हिंदूंचे धर्मांतर केले जाते. त्यांना रविवारी चर्चमध्ये प्रार्थनेसाठी नेले जाते. अशा घटनांना रोखण्यासाठी आम्ही काही ठिकाणी ‘रविवारऐवजी साप्ताहिक सुट्टी अन्य दिवशी द्यावी’, अशी मागणी केली. असे झाल्याने परिणामस्वरूप रविवारी चर्चमध्ये जाणार्‍या हिंदूंच्या संख्येत घट झाली.’’

प्रत्येक ३ मासांनी हिंदू अधिवेशनांची आवश्यकता ! – सतीश वैद

सनातन संस्था आणि संत हेच हिंदु धर्माला वाचवू शकतात. एकेठिकाणी मी व्याख्यानासाठी गेल्यावर एका युवकाने ‘हिंदु धर्मावर अनेक आक्रमणे होऊन हिंदु धर्म अजूनपर्यंत टिकून कसा आहे ?’ असा प्रश्‍न मला विचारला होता. त्या युवकाने अधिवेशनाला आलेल्या या हिंदु विरांना पाहिले असते, तर ‘याच हिंदु योद्ध्यांमुळे हिंदु धर्म जिवंत आहे’, हे त्याच्या लक्षात आले असते. ‘घरवापसी’ करण्यासाठी अशा प्रकारचे अधिवेशन दर ३ मासांनी होणे आवश्यक आहे.


Multi Language |Offline reading | PDF