नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होऊन त्यांनी देशाला मजबुतीकडे नेणे, ही ईश्‍वरी योजना ! – उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना

दैनिक सामनातील अग्रलेख

हिंदूंनो, नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणे, याप्रमाणे वर्ष २०२३ मध्ये ‘हिंदु राष्ट्राची स्थापना होणे’, हेसुद्धा ईश्‍वरी नियोजन आहे, याविषयी दृढ श्रद्धा बाळगा !

मुंबई, ३० मे (वार्ता.) – देशापुढे अनेक प्रश्‍न आहेत; मात्र त्या प्रश्‍नांचा डोंगर हिमतीच्या वज्रमुठीने फोडण्याचे साहस पंतप्रधान मोदी यांच्या मनगटात आहे. मोदी यांच्या शपथग्रहण सोहळ्याचे हेच महत्त्व आहे. मोदी यांनी देशाच्या जनतेचे पालकत्व स्वीकारले आहे. ते कालपर्यंत प्रधानसेवक होते, चौकीदार होते. आज पालक झाले आहेत. त्यांचा आधार वाटावा, विश्‍वास वाटावा, असे वातावरण निर्माण झाले. तोच त्यांच्या विजयाचा राजमार्ग ठरला. देहलीतील त्यांचा शपथ सोहळा हा देशाला मजबुतीकडे नेणारा ठरेल, ही ईश्‍वरी योजनाच आहे, अशा शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांची स्तुती केली आहे. ३० मेच्या दैनिक सामनातील अग्रलेखातून त्यांनी मोदी पंतप्रधान होणे, हे ईश्‍वरी संकेत असल्याचे सांगून भगवंताच्या अस्तित्वाविश्‍वाविषयी विश्‍वास व्यक्त केला आहे. (अनेक संतांचे आशीर्वाद आणि त्यांच्या आध्यात्मिक बळामुळे नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत. ईश्‍वराच्या आशीर्वादाने प्राप्त झालेल्या संधीचा त्यांनी ईश्‍वरी कार्यासाठी उपयोग करून घेतला, तरच खर्‍या अर्थाने त्यांच्या विजयाचे सार्थक झाले, असे हिंदू म्हणून शकतील. नरेंद्र मोदी यांनी हिंदूंचा हा विश्‍वास सार्थ करून दाखवावा ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF