अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांच्या अटकेच्या निषेधार्थ हिंदुत्वनिष्ठांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया

जर एका अधिवक्त्याला अटक होऊ शकते, तर ‘एल्गार परिषदे’चे आयोजक असलेल्या माजी न्यायाधिशांना अटक का होत नाही ?

अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांच्या अटकेचा निषेध ! हिंदुत्वाच्या विषयावर, हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांच्या बाजूने, धर्म आणि सत्य यांच्या रक्षणाकरता नेहमी लढणार्‍या एका सज्जन व्यक्तीला निवडणूक निकाल लागल्यानंतर लगेच अटक करून सरकारने पुरोगाम्यांसमोर लोटांगण घातले आहे. अधिवक्ता पुनाळेकर यांच्यासारखी निःस्वार्थी धर्मरक्षक व्यक्ती मी पाहिली नाही. स्वतःच्या भवितव्याची पर्वा न करता, स्वतःचे लाखो रूपये खर्च करून अधिवक्ता पुनाळेकर यांनी अनेक हिंदुत्वनिष्ठांना साहाय्य केले आहे. अधिवक्ता पुनाळेकर यांच्या सुटकेसाठी माझ्याकडून जे साहाय्य करता येईल, ते मी करीन.

जर सरकार निःपक्षपाती आहे, तर ‘एल्गार परिषदे’च्या आयोजकांपैकी असलेले माजी न्यायाधीश कोळसे-पाटील आणि पी.बी. सावंत यांना अटक का केली जात नाही ? जर एका अधिवक्त्याला अटक होऊ शकते, तर माजी न्यायधिशांना अटक का होत नाही ? ‘एल्गार परिषद’ हेही एक कारस्थान होते आणि त्यामुळे दंगे झाले, त्याचे काय ? सरकार पुरोगाम्यांना घाबरते का ?

– श्री. दिलीप अलोणी, राष्ट्रीय एकात्मता रक्षा मंच, ठाणे.


Multi Language |Offline reading | PDF