संसदेचे अधिवेशन समाजासाठी आध्यात्मिकदृष्ट्या हानीकारक असणे, तर हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी असणारे ‘अखिल भारतीय हिंदू राष्ट्र अधिवेशन’ समाजासाठी आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक असणे

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने ‘पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी)’ या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने केलेली वैज्ञानिक चाचणी

‘जेव्हा एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने काही व्यक्ती एकत्रित येतात, तेव्हा तेथे जाणवणारी स्पंदने त्या व्यक्ती, वास्तु, कार्यक्रमाचे स्वरूप इत्यादी यांच्या एकत्रित परिणामानुसार ठरतात. या दृष्टीने ‘संसदेचे अधिवेशन’ आणि ‘अखिल भारतीय हिंदू अधिवेशन’ यांतून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा वातावरणावर होणार्‍या परिणामाचा वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यास करण्यासाठी ७.६.२०१७ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी)’ तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आला. या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने वस्तू आणि व्यक्ती यांच्या ऊर्जाक्षेत्राचा (‘ऑरा’चा) अभ्यास करता येतो. या चाचणीची निरीक्षणे आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

१. चाचणीचे स्वरूप

या चाचणीत एका पटलावर रिकामा ठोकळा ठेवून वातावरणाची ‘पिप’ तंत्रज्ञानाद्वारे छायाचित्रे घेतली. ही ‘मूळ नोंद’ होय. त्यानंतर भारताच्या संसदेच्या १६ व्या लोकसभेच्या वर्ष २०१६ मधील पावसाळी अधिवेशनाचे छायाचित्र आणि जून २०१६ मधील ‘पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशना’चे छायाचित्र एकेक करून पटलावर ठेवून ‘पिप’ छायाचित्रे घेतली. या छायाचित्रांचा तुलनात्मक अभ्यास केल्यानंतर ‘दोन्ही अधिवेशनांतून प्रक्षेपित होत असलेल्या स्पंदनांचा वातावरणावर काय परिणाम होेतो ?’, हे जाणता आले.

संसदेच्या अधिवेशनाच्या छायाचित्रातून नकारात्मक, तर अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या छायाचित्रातून सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होतात, हे दर्शवणारी ‘पिप’ छायाचित्रे !

सूचना १ :  ही वातावरणातील प्रभावळीची चाचणी असल्याने ‘पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट  इंटरफेरन्स फोटोग्राफी)’ छायाचित्र क्र. २ आणि ३ यांची तुलना मूळच्या प्रभावळीशी (छायाचित्र  क्र. १ शी) करतांना छायाचित्रांतील पटल, तसेच छायाचित्रे यांवरील रंग येथे ग्राह्य धरलेले नाहीत.

सूचना २ :  ‘पिप’ छायाचित्रांत रंगांविषयी लिहितांना नकारात्मक स्पंदने दर्शवणार्‍या रंगांविषयी लिखाण गडद जांभळ्या रंगात, तर सकारात्मक स्पंदने दर्शवणार्‍या रंगांविषयी लिखाण निळ्या रंगात दिले आहे.

सूचना ३ :  ‘पिप’ छायाचित्रात पोपटी किंवा पांढरा (चंदेरी) हे उच्च सकारात्मक स्पंदनांचे दर्शक असलेले रंग दिसू लागल्यास काही वेळा पिवळा, गडद हिरवा किंवा हिरवा या सर्वसाधारण सकारात्मक स्पंदनांच्या दर्शक रंगांचे प्रमाण घटते किंवा ते रंग पूर्णपणे दिसेनासे होतात. हा चांगला पालट समजला जातो; कारण त्या वेळी सर्वसाधारण सकारात्मक स्पंदनांची जागा त्यापेक्षाही उच्च प्रतीच्या सकारात्मक स्पंदनांनी घेतलेली असते.

२. निरीक्षणे आणि त्यांचे विवेचन

२ अ. चाचणीतील घटकांच्या प्रभावळीतील काही महत्त्वाच्या स्पंदनांची तुलनात्मक स्थिती

वरील सारणीमध्ये ‘मूळ नोंदी’च्या प्रभावळीतील (चाचणीतील घटक चाचणीसाठी ठेवण्यापूर्वीच्या वातावरणाच्या प्रभावळीतील) आणि चाचणीतील घटकांच्या प्रभावळीतील महत्त्वाची स्पंदने दर्शवणार्‍या रंगांचे प्रमाण दिले आहे. पुढे दिलेल्या विवेचनात चाचणीतील घटकांच्या प्रभावळींची तुलना ‘मूळ नोंदी’च्या प्रभावळीशी केली आहे.

२ आ. चाचणीतील संसदेच्या अधिवेशनाच्या छायाचित्रामुळे वातावरणातील सकारात्मक स्पंदनांचे प्रमाण न्यून होणे, तसेच चैतन्याच्या स्पंदनांचे प्रमाण पुष्कळ घटणे : वरील सारणीवरून लक्षात येते की, ‘मूळ नोंदी’च्या तुलनेत संसदेच्या अधिवेशनाच्या छायाचित्राच्या प्रभावळीतील एकूण सकारात्मक स्पंदने १० टक्के घटली होती. चैतन्याचा पिवळा रंगही १५ टक्के घटला होता. थोडक्यात, ‘मूळ नोंदी’च्या तुलनेत संसदेच्या अधिवेशनाच्या छायाचित्रामुळे वातावरणातील सकारात्मक स्पंदनांचे प्रमाण न्यून झाले, तसेच चैतन्याच्या स्पंदनांचे प्रमाण पुष्कळ घटले, हे लक्षात येते.

२ इ. अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या छायाचित्रामुळे वातावरणात शुद्धतेची स्पंदने पुष्कळ प्रमाणात प्रक्षेपित होणे, वातावरणातील चैतन्याच्या स्पंदनांचे प्रमाण वाढणे आणि नकारात्मक स्पंदनांचे प्रमाण पुष्कळ न्यून होणे : अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या छायाचित्राच्या प्रभावळीच्या संदर्भात सकारात्मक स्पंदनांमध्ये वाढ दर्शवणारी पुढील सूत्रे लक्षात आली.

१. ‘मूळ नोंदी’च्या तुलनेत अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या छायाचित्राच्या प्रभावळीतील सकारात्मक स्पंदने १२ टक्के वाढली होती.

२. प्रभावळीतील चैतन्याचा पिवळा रंगही ‘मूळ नोंदी’तील चैतन्याच्या पिवळ्या रंगाच्या तुलनेत ९ टक्के अधिक होता.

३. चैतन्याच्या पिवळ्या रंगापेक्षा उच्च स्तरीय सकारात्मक स्पंदने (शुद्धता आणि पवित्रता) दर्शवणारा निळसर पांढरा रंग मूळ प्रभावळीत दिसत नव्हता; परंतु  अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या छायाचित्राच्या प्रभावळीत १५ टक्के एवढ्या मोठ्या प्रमाणात दिसत होता.

थोडक्यात, अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या छायाचित्रामुळे वातावरणात शुद्धतेची स्पंदने प्रक्षेपित झाली, तसेच वातावरणातील चैतन्याचे प्रमाण पुष्कळ वाढले आणि नकारात्मक स्पंदनांचे प्रमाण पुष्कळ न्यून झाले, असे लक्षात येते.

वरील सर्व सूत्रांविषयी अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण ‘सूत्र ४’ मध्ये दिले आहे.

३. निष्कर्ष

‘संसदेच्या अधिवेशनाच्या छायाचित्रातून नकारात्मक, म्हणजे आध्यात्मिकदृष्ट्या हानीकारक स्पंदने प्रक्षेपित होत आहेत, तर अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या छायाचित्रातून सकारात्मक, म्हणजे आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक स्पंदने प्रक्षेपित होत आहेत’, हे या चाचणीतून दिसून आले.

४. चाचणीतील निरीक्षणांमागील अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण

४ अ. संसदेच्या अधिवेशनाच्या छायाचित्रातून नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होण्याचे अध्यात्मशास्त्रीय कारण : ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्याच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात’, हे अध्यात्मातील एक तत्त्व आहे. या तत्त्वानुसार संसदेच्या अधिवेशनाच्या छायाचित्रासह (रूप) त्यातील स्पंदने (शक्ती) असतात. हे छायाचित्र १६ व्या लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनाचे आहे. या लोकसभेतील ५४३ सदस्यांपैकी ५४१ सदस्यांच्या पार्श्‍वभूमीचा ‘इंडियाज असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्मस्’ (India’s Association for Democratic Reforms) या अशासकीय संघटनेने केलेल्या अभ्यासातून दिसून आले आहे, ‘५४१ पैकी १८६, म्हणजे ३४ टक्के सदस्यांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे प्रविष्ट आहेत.’ यांपैकी बहुतेक सदस्यांवर प्रविष्ट असलेले गुन्हे हत्या, अपहरण, महिलांवरील अत्याचार, अशा गंभीर स्वरूपाचे आहेत. या व्यतिरिक्त संसदेच्या अधिवेशनात सदस्यांची अल्प उपस्थिती, राष्ट्राच्या व्यापक हिताच्या दृष्टीने अभ्यासपूर्ण सहभागाचा अभाव, संसदेत हुल्लडबाजी करून संसदेचा अमूल्य वेळ वाया घालवणे, मारामारी करून सदनात तोडफोड करणे, या मोजक्याच सूत्रांचा विचार केला, तरी ‘संसदेच्या अधिवेशनातून नकारात्मक स्पंदने का प्रक्षेपित होतात ?’, हे सहज स्पष्ट होते. ही सूत्रे अल्प-अधिक फरकाने सर्व लोकसभांच्या सर्व अधिवेशनांना लागू पडतात.

४ आ. अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या छायाचित्रातून सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होण्याचे अध्यात्मशास्त्रीय कारण : ‘अखिल भारतीय हिंदू अधिवेशना’साठी असणारा परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संकल्प, संतांची उपस्थिती, हिंदु राष्ट्राची स्थापना करण्याच्या उदात्त हेतूने प्रेरित झालेले राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी आयोजक, वक्ते, श्रोते, मंदिराचे सभागृह असलेले कार्यस्थळ, तसेच कार्यस्थळाची सात्त्विक सजावट आदी अधिवेशनाशी संबंधित सर्वच घटक सत्त्वप्रधान होते. यामुळे वातावरणातील सकारात्मक ऊर्जेचे प्रमाण पुष्कळ वाढले.

एकूणच संसदेचे अधिवेशन वातावरणात नकारात्मक ऊर्जा प्रक्षेपित करणारे असल्याने समाजासाठी आध्यात्मिकदृष्ट्याही हानीकारक आहे, तर हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी असणारे ‘अखिल भारतीय हिंदू अधिवेशन’ हे वातावरणात सकारात्मक ऊर्जा प्रक्षेपित करणारे असल्याने समाजासाठी आध्यात्मिकदृष्ट्याही लाभदायक आहे’, हेे या चाचणीने दाखवून दिले.’

– आधुनिक वैद्या (डॉ.) सौ. नंदिनी सामंत, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (८.६.२०१७)

ई-मेल : [email protected]

वाचकांना सूचना : जागेअभावी या लेखातील ‘पिप’ तंत्रज्ञानाच्या साहाय्याने घटकांची सकारात्मक आणि नकारात्मक स्पंदने रंगांच्या माध्यमातून दिसण्याची सुविधा असणे’, ‘चाचणीसंबंधाने घेतलेली दक्षता’, ‘प्रभावळीत दिसणार्‍या रंगांची माहिती’ इत्यादी नेहमीची सूत्रे goo.gl/tVR7Pw या दैनिक सनातन प्रभातच्या संकेतस्थळावरील लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.


Multi Language |Offline reading | PDF