(म्हणे) ‘अंतर्गत राजकारणामुळे भारताने आमंत्रण दिले नाही !’ – पाक

पाक एक इस्लामी आतंकवादी देश आहे. अशा देशाला मागील शपथविधीच्या वेळी भारताने आमंत्रित केले होते; मात्र पाकमध्ये कोणतीही सुधारणा झाली नाही. त्यामुळे पाकला आता संपवण्याचाच प्रयत्न करायला हवा !

शाह महमूद कुरेशी

कराची (पाकिस्तान) – लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी नरेंद्र मोदी यांचे पूर्ण लक्ष पाकला शिव्या देण्यावरच होते. सध्या त्यांच्या या धोरणांमध्ये काही पालट होईल, अशी अपेक्षा करणे अज्ञानच ठरील. भारताच्या या अंतर्गत राजकारणामुळेच पाकला आमंत्रित करण्यात आले नाही, अशी प्रतिक्रिया पाकचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी व्यक्त केली आहे.


Multi Language |Offline reading | PDF