नक्षलवाद्यांनी केलेल्या बॉम्बस्फोटात ११ सैनिक घायाळ

भाजप सरकारच्या पहिल्या ५ वर्षांच्या कार्यकाळात नक्षलवाद संपवता आला नाही, आता पुढच्या ५ वर्षांत तरी तो संपवला जाणार आहे का ?

सरायकोला (झारखंड) – येथे नक्षलवाद्यांनी केलेल्या बॉम्बस्फोटामध्ये ११ सैनिक घायाळ झाले. त्यांना हेलिकॉप्टरमधून रांची येथील रुग्णालयात नेण्यात आले आहे. २८ मेच्या पहाटे येथे कोब्रा फोर्स आणि झारखंड पोलीस यांच्या संयुक्त पथकाने जंगलात विशेष मोहीम राबवली. त्या वेळी नक्षलवाद्यांनी हा स्फोट घडवला.


Multi Language |Offline reading | PDF