महान तपस्व्यांवरील श्रद्धेमुळे काळजी नसणे

प.पू. आबा उपाध्ये आणि कै. प.पू. (सौ.) मंगला उपाध्ये

‘तब्बेतीला जास्त त्रास देऊ नको. तुझी विश्रांती नसणार, धावाधाव असणार, म्हणजे बेट्यावर (गुरुजींवर) आलेले एक प्रकारचे ओझेच. त्याच्यावर आलेले ओझे, म्हणजे माझे ओझे. आवश्यक गोष्टी जरी करायच्या असल्या, तरी त्या करवतील तेवढ्याच करा. आडवेळी संकट आले, तर जसे गुरुजींवर सर्व टाकल्यावर तुम्हाला काळजी वाटत नाही, तसे माझेही मन महान तपस्व्यांवरील श्रद्धेत गढून गेल्यामुळे मीही काळजीत नसतो. तेव्हा त्या बाबतीत काळजी करण्याचे कारण नाही.’- प.पू. सदानंद स्वामी (प.पू. आबा उपाध्ये, पुणे यांच्या माध्यमातून) (२०.१२.१९८७)


Multi Language |Offline reading | PDF